Thackeray Group Politics Sarkarnama
मुंबई

Thackeray Group : ठाकरे गटानं दहा नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी; लोकसभेसाठी मोर्चेबांधणी

Maharashtra Politics : जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहे.

Mangesh Mahale

Mumbai : पुढील वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी ठाकरे गटाने लोकसभेसाठी संघटनात्मक बांधणीवर भर देत विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे.

संघटनात्मक बांधणीसाठी ठाकरे गटाची नवी रचना करीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं आहे. ठाकरे गट अॅक्शन मोडवर आला आहे.

उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या दहा नेत्यांवर राज्यातील विभागवार संघटनात्मक, तसेच आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने विशेष जबाबदारी सोपवली आहे.

उद्धव ठाकरेंनी सर्वात आधी नेते मंडळात वाढ करून नेत्यांची संख्या वाढवली होती. आता या नेत्यांवर विभागवार बांधणीची जबाबदारी टाकून निवडणुकांच्या तयारीसाठी पुढचे पाऊल ठाकरे गटानं टाकलं आहे.

उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम आणि पूर्व विदर्भाची जबाबदारी 10 नेत्यांवर सोपविण्यात आली आहे. जानेवारी महिन्यात उद्धव ठाकरे महाराष्ट्र दौरा करणार आहेत. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा दौरा आणि जाहीर सभांचे नियोजनसुद्धा लवकर जाहीर केले जाणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

कोणत्या नेत्याकडे कोणती जबाबदारी?

खासदार संजय राऊत

लोकसभा मतदारसंघ नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, नगर, शिर्डी, : पुणे, बारामती, शिरूर, मावळ (विधानसभा पिंपरी-चिंचवड, मावळ)

अनंत गीते -कोकण (रायगड)

लोकसभा मतदारसंघ : रायगड, मावळ (विधानसभा पनवेल, कर्जत, उरण ) -

चंद्रकांत खैरे- मराठवाडा

लोकसभा मतदारसंघ : संभाजीनगर, जालना

खासदार अरविंद सावंत- पश्चिम विदर्भ

लोकसभा मतदारसंघ : बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ - वाशीम, वर्धा

खासदार अनिल देसाई- पश्चिम महाराष्ट्र

लोकसभा मतदारसंघ : सातारा, माढा, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी

आमदार सुनील प्रभू- मराठवाडा, सोलापूर

लोकसभा मतदारसंघ : सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड

आमदार भास्कर जाधव- पूर्व विदर्भ

लोकसभा मतदारसंघ : नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली-चिमूर

खासदार विनायक राऊत-कोकण (रत्नागिरी, सिंधुदुर्ग )

लोकसभा मतदारसंघ : रत्नागिरी, सिंधुदुर्ग

खासदार राजन विचारे-कोकण (ठाणे, पालघर )

लोकसभा मतदारसंघ : ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर

आमदार रवींद्र वायकर-मराठवाडा

लोकसभा मतदारसंघ - नांदेड, हिंगोली, परभणी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT