Shivsena : मागील दोन वर्षाच्या कोरोना कालखंडनंतर माघ पौर्णिमेला मच्छिंद्रनाथ उत्सव साजरा होत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मलंग गडावर हजेरी लावली. शिंदेंच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी हिंदुत्वाचा नारा देत मलंग गडावर हिंदुत्ववादी विचारांचा जागर केला.
यंदाच्या यात्रेचे वैशिष्ट्य ठरले ते म्हणजे, शिवसेनेच्या दोन वेगळ्या गटांचा, दोन वेगवेगळ्या आरती पार पडले. दुपारी महाआरतीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते तर दुपारनंतर ठाकरे गटाचे विधानपरिषद विरोधीपक्ष नेते आंबादास दानवे, खासदार राजन विचारे, केदार दिघे यांनी श्री मच्छिंद्रनाथांची महाआरती केली.
मलंगगड येथील आंदोलन हे शिवसैनिकांच्या हिंदुत्ववादी लढ्यातील एक महत्वाचे आंदोलन आहे. मात्र आता शिवसेनेत फुटपडल्यामुळे शिंदे व ठाकरे असे दोन शिवसेनेचे गट पडले आहेत. उत्सवावेळी शिवसेनेच्या दोन्हा गटांकडून आमने - सामने मंडप ठोकत जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आले. यावेळी उत्सवाला कोणतेही गालबोट लागू नये, म्हणून पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला हो
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेने 1982 पासून शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांच्या नेतृत्वाखाली मलंगगड मुक्तीचे आंदोलन सुरू झाले असून एक वेगळे महत्व या आंदोलनाला आहे. कोरोनाच्या नंतर प्रथमच हा उत्सव रविवारी मलंगगडावर साजरा करण्यात आला.
शिवसेनेत ठाकरे व शिंदे असे दोन गट पडल्याने दोन्ही गट आमने सामने आल्याचे यावेळी पहायला मिळाले. दोन्ही गटाकडून मोठ्या प्रमाणात बॅनर बाजी रस्त्याने करण्यात आली होती. सकाळीच ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार राजन विचारे, जिल्हा संपर्क प्रमुख सुभाष भोईर यांसह अनेक कार्यकर्ते गडाच्या पायथ्याशी जमले होते. तर शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर, भाऊसाहेब चौधरी, रवी पाटील हे देखील उपस्थित होते.
दुपारी 12.30 च्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडाच्या पायथ्याशी आले. मुख्यमंत्री येताच शिंदे गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील घोषणाबाजी करत प्रति-उत्तर दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांसह गडावर हजेरी लावत आरती केली. तर ठाकरे गटाचे दानवे, विचारे यांनी देखील गड चढून जात दर्शन घेतले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.