Shivsena News : विधान परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेचे दोन नेते आमदार झाले; पण ठाकरेंची पाटी कोरीच!

Shiv Sena News : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पाटी मात्र, कोरीच राहिली आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Shiv Sena News : विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची पाटी मात्र, कोरीच राहिली आहे. विशेष, म्हणजे या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे दोन नेते आमदार झाले आहेत.

कोकण शिक्षक पदवीधर निवडणुकीत विजयी झालेले ज्ञानेश्वर म्हात्रे हे शिवसेनेमध्येच (Shivsena) होते. त्यांनी शिक्षक सेनेच्या माध्यमातून कोकण शिक्षक मतदार संघ पिंजून काढला होता. मागील निवडणुकीत म्हात्रे यांनी दुसऱ्या क्रमांकाची मते घेतली होती. त्यानंतर त्यांनी मागील निवडणुकीनंतर कोकण शिक्षक मतदार संघ पिंजून काढत त्यांनी दहा हजार शिक्षकांची नोंदणी केली होती. त्यामुळे त्यांना विजय सोपा झाला.

Uddhav Thackeray News
Kasba by-election : पक्ष नेत्याच्या वाढदिवसात अडकली काँग्रेसची कसब्यातील उमेदवारी

मात्र, भाजपने त्यांना हेरले आणि निवडणुकीत उमेदवारी दिली. त्यामुळे भाजपला (BJP) येथे तगडा उमेदवार मिळाला. त्यातच म्हात्रे यांना भाजपचे बळ मिळाले आणि कोकणातील जागेवर भाजपने सहज बाजी मारली. त्यामुळे शिवसेनेच्या नेत्याने भाजपमध्ये जाऊन आमदारकी मिळवली.

तसेच, विधान परिषद निवडणुकीत सर्वाधिक काळ मतमोजणी चालली ती अमरावती पदवीधर निवडणुकीची त्यामध्ये धीरज लिंगाडे यांनी बाजी मारली. लिंगाडे हे बुलडाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. त्यांनीही वेळेवर काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांना काँग्रेसने (Congress) अमरावतीमध्ये उमेदवारी दिली. यामध्ये लिंगाडे यांनी बाजी मारली.

Uddhav Thackeray News
Kasba by-election : कसब्यात इतिहासाची पुनरावृत्ती करायचीच : काँग्रेसने बांधला चंग; पटोलेंचा पुण्यात तळ

या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गट नागपुरच्या जागेसाठी अडून बसला होता. मात्र, वेळेवर ती जागाही काँग्रेसला सोडण्यात आली. त्यानंतर नाशिकमध्ये सत्यजीत तांबे यांनी अपक्ष अर्ज भरला आणि शिवसेनेने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला. या निवडणुकीत शिवसेनेचे दोन नेते आमदार झाले. मात्र, शिवसेनेची पाटी कोरीच राहिली, अशी चर्चा सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात रंगली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com