Uddhav Thackeray - Droupadi Murmu Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : मराठा - धनगर आरक्षणासाठी ठाकरे गटाची मोठी खेळी; थेट राष्ट्रपतींनाच पत्र, केली 'ही' मागणी

Deepak Kulkarni

Mumbai News : महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. याच मुद्द्यावरून सत्ताधारी - विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगला आहे. अशातच शिंदे -फडणवीस - पवार सरकारच्या मराठा आरक्षणासाठी घडामोडी वाढल्या आहेत. याचवेळी ठाकरे गटाने थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडेच भेटीची वेळ मागितल्याची बाब समोर येत आहे. यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत(Vinayak Raut) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी खासदार राऊतांनी पत्राद्वारे राष्ट्रपती मुर्मू यांच्याकडे केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊतांनी पत्रात नेमकं काय म्हटलंय?

खासदार विनायक राऊत यांनी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू (Droupadi Murmu) यांच्याकडे मराठा आरक्षण आणि धनगर आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी वेळ मागितली आहे. पत्रात राऊत म्हणाले, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आणि खासदारांचं शिष्टमंडळ खासदार संजय राऊत यांच्या नेतृत्वात आपली भेट घेऊ इच्छित आहेत.

आम्ही येत्या 5 आणि 6 नोव्हेंबरला सर्वजण आपली भेट घेऊ इच्छित आहोत. त्यामुळे आपल्या सोयीनुसार आम्हाला वेळ देण्याची कृपा करावी, अशी विनंतीही राऊतांनी पत्रात केली आहे.

'या' नेत्यांचा शिष्टमंडळात समावेश!

खासदार संजय राऊत, विनायक राऊत,अनिल देसाई,अरविंद सावंत, प्रियंका चतुर्वेदी, राजन विचारे, ओमराजे निंबाळकर, संजय जाधव, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार अजय चौधरी, आमदार सुनील प्रभू यांचं शिष्टमंडळ राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचा पत्रात राऊत म्हणाले आहेत.

ठाकरे गटाच्या खासदार आमदारांनी केलेली मागणी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वीकारणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाकरे गटाला वेळ देतात का ? किंवा ते मराठा आणि धनगर आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्यासाठी सूचना देतात का? याविषयी चर्चांना उधाण आले आहे.(Maratha Reservation)

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT