Dhananjay Munde - Karuna Sharma
Dhananjay Munde - Karuna SharmaSarkarnama

Dhananjay Munde - Karuna Sharma : करुणा शर्मा २०२४ ला धनंजय मुंडेंची 'अशी' करणार अडचण...

Marathwada Political News : " करुणा शर्मा यांनी परळीतून निवडणूक लढवली तर..."
Published on

Beed Politics : धनंजय मुंडे यांना मी सोडणार नाही, त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी मी बीड शहरात घर विकत घेतले आहे. त्यांनी माझ्याविरुद्ध निवडणूक लढवण्यासाठी तयार राहावे, असे आव्हान करुणा शर्मा यांनी गेल्या वर्षी दिले होते. त्याच्या आधी बीडमध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.

परळी विधानसभा मतदारसंघातून करुणा शर्मा निवडणूक लढवतील हे निश्चित मानले जात आहे. त्या निवडणूक जिंकणार नाहीत, मात्र धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यासमोर अडचणी निश्चितपणे उभ्या करू शकतील. मानवी संबंधातील नैतिकता-अनैतिकतेवर ही निवडणूक घेऊन जाण्याचा करुणा शर्मा यांचा प्रयत्न राहणार आहे.

Dhananjay Munde - Karuna Sharma
Raju Shetti : 'शेतकऱ्यांचे नुकसान होणार असेल तर...'; राजू शेट्टींचा कारखानदारांना थेट इशारा

करुणा शर्मा यांच्यासोबत माझे परस्पर सहमतीने २००३ पासून संबंध आहेत, अशी कबुली धनंजय मुंडे यांनी १२ जानेवारी २०२१ रोजी दिली होती. तत्पूर्वी, करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने त्यांच्यावर दुष्कर्माचा आरोप केला होता. त्यावर स्पष्टीकरण देताना धनंजय मुंडे यांनी अशा प्रकारची कबुली दिली होती.

धनंजय मुंडे- करुणा शर्मा (Karuna Sharma) यांच्या नात्याची सर्वांना माहिती होती. त्यावर कोणाचाही आक्षेप नव्हता. सर्वकाही सुरळीत असताना करुणा शर्मा यांची बहीण रेणू शर्मा हिने धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला. करुणा यांच्या बहिणीने धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केल्याचेही समोर आले होते.

धनंजय मुंडे यांच्या तक्रारीवरून त्यांना अटक झाली होती. त्यानंतर संघर्ष सुरू झाला होता. मुंडे हे माझे पती आहेत आणि मी त्यांची पत्नी आहे, असे करुणा शर्मा यांनी मागे जाहीरपणे म्हटले होते. मुलांच्या नावासमोर सर्व कागदपत्रांवर धनंजय मुंडे यांचे नाव आहे. मुंडेंनी माझा तिरस्कार केला, मला २७ वर्षांनंतर वाऱ्यावर सोडले, असेही आरोप करुणा शर्मा यांनी केले होते.

ब्लॅकमेलर मी आहे की धनंजय मुंडे आहेत, हे कागदपत्रांतून कळेल. कायद्यानुसार मी कोट्यवधी रुपयांची मालकीण आहे. मुंडे यांनी निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे, असे अनेक आरोप करुणा शर्मा यांनी केले होते.

Dhananjay Munde - Karuna Sharma
Ambadas Danve News : इंटरनेट सेवा बंद करून अंतरवालीत पुन्हा `मारझोड कांड` करायचे आहे का ?

धनंजय मुंडे हे युवा मोर्चाचे अध्यक्ष असतानाच्या काळात त्यांचे मुंबईला सतत येणे -जाणे असायचे. त्याच काळात त्यांचा करुणा शर्मा यांच्याशी संबंध आला. त्याला कोणाचीही हरकत नव्हती. करुणा शर्मा यांच्या बहिणीचा विषय समोर आल्यानंतर त्यांच्यात बेबनाव सुरू झाला.

बीड जिल्ह्यातील परळी मतदारसंघ हा तसा ग्रामीण भागच. करुणा शर्मा यांनी परळीतून निवडणूक लढवली तर त्या जिंकतील का, या प्रश्नाचे उत्तर अर्थातच नाही असे आहे. मात्र, त्यांच्या उमेदवारीमुळे निवडणूक एका वेगळ्या पातळीवर जाऊ शकते, हे मात्र निश्चित आहे. लिव्ह इन, दुसरी बायको, विवाहबाह्य संबंध अशा विषयांबाबत ग्रामीण भागात वेगळी मते असतात. अर्थात ती चांगली नसतात. त्यामुळे करुणा शर्मा निवडणुकीत उतरल्या आणि त्यांनी प्रचार सुरू केला, तर धनंजय मुंडे यांची अडचण होऊ शकते.

Dhananjay Munde - Karuna Sharma
Maharashtra Drought: जत तालुक्याला दुष्काळी यादीतून वगळले; संतप्त नागरिकांनी तहसीलदारांची गाडी फोडली

करुणा शर्मा यांना महिलांची सहानुभूती...

करुणा शर्मा यांना महिलांची सहानुभूती मिळू शकते. धनंजय मुंडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचा प्रबळ उमेदवार असेल, तर मग त्यांची अडचण आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. करुणा शर्मा यांनी बीडमध्ये घर खरेदी केले आहे, म्हणजे ते निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

...त्यावेळी करुणा मुंडे यांच्या आरोपांना धार!

धनंजय मुंडे हे महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्री होते, त्यावेळी करुणा मुंडे यांच्या आरोपांना धार होती. त्या सतत काही ना काही बोलत राहायच्या.आताही त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांचे आणि धनंजय मुंडे यांचे फोटो त्या टाकत असतात. धनंजय मुंडे हे महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर करुणा शर्मा यांच्या आरोपांची धार थोडी कमी झाल्याचे जाणवत आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Dhananjay Munde - Karuna Sharma
Nitesh Rane - Manoj Jarange Patil : " माझी किंमत भाजपला माहितीय, पण तुमची..."; राणेंचा जरांगे पाटलांना खोचक सल्ला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com