uddhav thackeray | eknath shinde | devendra fadnavis | ajit pawar sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray : "बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका..."; अत्याचारांच्या घटनांचा पाढा वाचत उद्धव ठाकरे कडाडले

Jagdish Patil

Mumbai News, 23 August : बदलापुरातील अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यातील वातावारण तापलं आहे. या घटनेवरून आता राजकीय नेत्यांकडीन आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच आता बदलापूर घटनेचा निषेध करण्यासाठी उद्या शनिवारी (ता. 24 ऑगस्ट) रोजी महाविकास आघाडीच्या वतीने महाराष्ट्र बंदचं आवाहन केलं आहे.

या बंदच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (Shivsena) ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्याच्या बंदमध्ये सर्व नागरिकांना धर्म-जात-पात आणि पक्षातील मतभेद विसरुन सामील होण्याचं आवाहन केलं.

तसंच लाडक्या बहिण योजनेला (Ladaki Bahin Yojna) विरोध नाही. मात्र, बहिणीच्या नात्याची किंमत केवळ पैसे देऊन या नात्याला कलंक लावू नका अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला. उद्धव ठाकरे म्हणाले, "उच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली ती राजकीयदृष्ट्या प्रेरित झाले म्हणून घेतली आहे का? न्यायालयाने उत्स्फूर्तपणाने या प्रकरणाचा जबाब विचारत असेल तर जनतेने देखील सरकारला याबाबतचा जाब विचारण्याचा अधिकार आहे. जनतेचं न्यायालय हे सर्वांपेक्षा वेगळं आहे.

सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा या न्यायालयाचा दरवाचा उघडतो. आणि आता तो हलायला लागला आहे. तो उघडू नये वाटत असेल तर या यंत्रणांनी आपापाली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली पाहिजे. मात्र, ती नीट पार पाडली जात नाही याची जाणीव करुन देण्यासाठी उद्याचा बंद असल्याचं ठाकरेंनी (Uddhav Thackeray) स्पष्ट केलं.

उद्याचा बंद विकृती विरुद्ध संस्कृती असा आहे. त्यामुळे या बंदचं यश-अपयश विकृती विरुद्ध संस्कृती यातच मोजता येईल असं म्हणत त्यांनी उद्या दोन वाजेपर्यंत बंद पाळण्याचं आवाहन करत महिलांच्या भवितव्याबाबतची चिंता व्यक्त केली.

बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका

दरम्यान, त्यांनी वृत्तपत्रातील अत्याचाराच्या घटनांची यादी माध्यमांसमोर दाखवत त्या घटनांचा पाढा वाचला. यावेळी एका ऑगस्ट महिन्यात घटलेल्या पुणे (Pune) अकोला, मुंबई, लातूर, नाशिक आणि कोल्हापूर शहरातील बातम्या दाखवत सरकरावर निशाणा साधला. "आम्ही लाडकी बहीण योजनेच्या विरोधात नाही.

पण केवळ तिची किंमत पैशात करुन बहिणीच्या नात्याला कलंक लावू नका. तिचं रक्षण करा, तिला पण वाटलं पाहिजे माझा भाऊ माझं रक्षण करतोय. तिला संरक्षणाशिवाय दुसरं काहीही महत्वाचं नसतं, या सर्व बातम्या वाचून संतापाचा कडेलोट होतोय," असं ठाकरे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT