PM Modi, Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Uddhav Thackeray News : 'सत्तेची भीती वाटते ती सत्ता काय कामाची', उद्धव ठाकरे कडाडले

Roshan More

Mumbai : जळगाव जिल्ह्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघातील भाजप पदाधिकारी तसेच शिंदे गटातील पदाधिकारी यांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना (उबाठा) मध्ये प्रवेश केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेत (उबाठा) दुसऱ्या पक्षातील नेत्यांचे प्रवेश वाढत आहेत. तोच धागा पकडून शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला आहे.

ज्या सत्तेची भीती वाटते ती सत्ता कामाची नसते. तुम्ही साथ द्या. ही सत्ता उलथून टाकू, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी करत केंद्र, राज्य सरकारला इशारा दिला. शिवसेनेत (Shivsena) काम करणार असाल पण सत्तेला घाबरणार असाल तर काय उपयोग नाही. मी जिद्दीने उभा आहे. तुम्ही फक्त साथ द्या. ही सत्ता उलथून टाकू, असे ठाकरे म्हणाले.

आपल्याकडे पक्ष, चिन्ह नाही. मात्र, इतर पक्षांच्या तुलनेत आपल्या पक्षात अधिक पक्षप्रवेश होत आहेत. त्याचे कारण म्हणजे आपल्याकडे उद्धव ठाकरे आहेत. त्यांच्याकडून पाहून लोक प्रवेश करत आहेत. आपण त्यांचे हात बळकट करायला हवेत, असे आवाहन संजय राऊत (sanjay raut) यांनी केले.

पुढील वर्ष लोकशाहीचे जावो...

देशात हुकुमशाही सुरू आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंकडून आपल्या जाहीर सभांमधून करण्यात येते. त्याच अनुषंगाने एक जानेवारीपासून नवीन वर्ष सुरू होत आहे. नवीन वर्ष लोकशाहीचे जावो, असे म्हणत ठाकरेंनी मोदींना टोला लगावला. सत्तांना सर्वांनी आपली वाटली पाहिजे. पण सत्तेची भीती वाटते आहे. ती उलथण्यासाठी तु्म्ही सर्व सहभागी आहात तुमचे स्वागत आहे, असे देखील ठाकरे पक्षप्रवेशा वेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT