Nanded Shivsena News : नांदेडमध्ये ठाकरे गटाचे नेते तीन दिवस तळ ठोकणार..

Marathwada News : नांदेडकडे मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष झाले.
Nanded Shivsena News
Nanded Shivsena NewsSarkarnama
Published on
Updated on

Marathwada Political News : शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाने पक्षाला पुन्हा उभारी देण्यासाठी संघटनात्मक पातळीवर काम सुरू केले आहे. आगामी लोकसभा आणि त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते नांदेड जिल्ह्यात तळ ठोकणार आहेत. (Nanded Shivsena News) ‌‌‌एकेकाळी शिवसेनेचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदेड जिल्ह्यात पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघाच्या संघटनात्मक कामाचा आढावा घेण्यात येत आहे.

Nanded Shivsena News
Ashok Chavan News : `मी जिथे आहे, तिथेच बरा`.. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर चव्हाण बोलले..

माजी मंत्री रवींद्र वायकर व संपर्क प्रमुख बबनराव थोरात हे प्रत्यक्ष मतदारसंघात जाऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना देणार आहेत. हा आढावा तीन दिवस घेण्यात येणार असून बुधवारी नायगाव, देगलुर बिलोली, मुखेड या तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर नंतर नांदेड (Nanded) जिल्ह्यात शिवसेनेला सर्वाधिक यश मिळाले होते.

जिल्ह्यातून चार-चार आमदार निवडून देणाऱ्या नांदेडकडे मध्यंतरी उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचेही दुर्लक्ष झाले. त्याचा फटकाही (Shivsena) शिवसेनेला विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषद आणि इतर निवडणुकांमध्ये बसला. गेल्या विधानसभा निवडणुकीत नांदेड उत्तर मधुन बालाजी कल्याणकर हे निवडून आले. गेल्या वर्षी शिवसेनेत फूट पडली तेव्हा त्यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या फाटाफूटीनंतर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघातील पक्षाची सद्यस्थिती काय आहे ? विधानसभा निवडणूकीसाठी संभाव्य उमेदवार कोण असू शकेल ? यासह संघटनात्मक पातळीवर परिस्थिती काय आहे ? याचा आढावा रविंद्र वायकर हे या तीन दिवसात घेणार आहेत. नांदेड लोकसभा मतदारसंघ महाविकास आघाडीच्या जागावाटपात काँग्रेसला सुटणार आहे.

लोकसभा निवडणूकीनंतर विधानसभा निवडणुक होईल तेव्हा किती जागा शिवसेना ठाकरे गटाला सुटतील हे जरी आज निश्चित नसले तरी आत्तापासूनच ठाकरे गटाने तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यातील नायगाव, बिलोली, मुखेड या तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. उद्या, गुरुवारी नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, कंधार लोहा तर शुक्रवारी भोकर, हादगाव, किनवट या तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात येणार आहे.

Nanded Shivsena News
Shivsena News : इम्तियाज जलील यांचे नेतृत्व चांगले ; ठाकरे गटाच्या नेत्याकडूनच कौतुक

या आढावा बैठकीला राज्य संघटक एकनाथ पवार, माजी खासदार सुभाष वानखेडे, माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, रोहिदास चव्हाण, जिल्हाप्रमुख बबनराव बारसे, माधव पावडे, बंडु खेडकर, सहसंपर्क प्रमुख भुजंग पाटील डक यांच्यासह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

Edited By : Jagdish Pansare

Nanded Shivsena News
Nanded Lok Sabha Constituency : पक्षावर श्रद्धा ठेवणारे, संयमी नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com