Shinde Vs Thackeray News Sarkarnama
मुंबई

Shinde Vs Thackeray News : बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी ठाकरे गट - शिंदे गट भिडले; आरोप- प्रत्यारोपांनी वातावरण पेटलं

Shivsena Political News : दोन्ही गटाकडून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न

Deepak Kulkarni

Mumbai News : शिवसेनेतील बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातून विस्तवही जात नाही. एकीकडे कायदेशीर लढाई सुरू असतानाच दुसरीकडे दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या चकमकी होत असतात.दसरा मेळाव्यातही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती.

आता बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिन शुक्रवारी आहे. याच दरम्यान, गुरुवारी रात्री शिंदे गट आणि ठाकरे गट शिवाजी पार्कवर आमने सामने आले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी गुरुवारी रात्री शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी जात त्यांना अभिवादन केले. यानंतर यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते उपस्थित होते.तसेच शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. याचवेळी ठाकरे गट देखील तेथे दाखल झाला. या दोन्ही गटाकडून एकमेकांना डिवचण्याचा प्रयत्न झाला. यामुळे वातावरण चांगलंच तापलं आहे.

ठाकरे गट आणि शिंदे गटाक़डून आरोप- प्रत्यारोपांच्या शाब्दिक चकमकींनी वातावरण चांगलंच तापलं आहे.यावेळी बाळासाहेंबाच्या स्मृतीस्थळी असलेले गजांचे कंपाऊंड तोडण्यात आले आहे. यावेळी ठाकरे गटाचे अनिल देसाई, माजी मंत्री अनिल परब(Anil Parab) यांच्यासह अनेक नेतेमंडळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. यानंतर काहीच वेळात ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिवाजी पार्कवर दाखल आले. त्यावेळी दोन्ही गटात जोरदार शाब्दिक चकमक उडाली. याचवेळी आमदार अनिल परब, खासदार अनिल देसाई आणि महेश पेडणेकरही स्मृती स्थळावर आले. यावेळी गद्दार गद्दार… अशा घोषणा देण्यात आल्या. गद्दारांना हाकलून द्या… अशा घोषणा देण्यात आल्या. तर शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे अंगार है, बाकी सब भंगार है, अशा घोषणाबाजी करण्यात आले.

तर शिंदे गटाकडून नरेश म्हस्के, आमदार सदा सरवणकर, शीतल म्हात्रे इतर नेतेमंडळी उपस्थित होते. या दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींनी एकमेकांवर आरोपांची राळ उठवली आहे. तर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे.शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी ही जागा कुणाच्या बापाच्या मालकीची नाही. यांच्या बापाची जागा नाही. ही जागा पालिकेची आहे. राज्य सरकारची आहे, अशी टीका केली.

तर शिंदे गटाचे नेते आमदार सदा सरवणकर यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला. ते म्हणाले, आम्हाला मारण्यासाठी रॉड काढण्यात आल्याचा आरोप सदा सरवणकर यांनी केला. तसेच आमच्या महिला नेत्यांवर हात उचलण्यात आला. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. आम्ही दर्शन घेऊन जाणार होतो. हे लोक आले आणि त्यांनी राडा करण्यास सुरुवात केली, असं सदा सरवणकर म्हणाले. तर ही जागा कुणाच्या बापाच्या मालकीची नाही. यांच्या बापाची जागा नाही. ही जागा पालिकेची आहे. राज्य सरकारची आहे, अशी टीका शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांनी केली.

ठाकरे गट शिंदे गट आमने सामने आल्यानंतर आता पोलिसांनी शिवाजी पार्कवर दाखल झाले आहेत. पोलिसांकडून दोन्ही गटाच्या नेत्यांना समजावण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण कोणीही माघार घेण्याच्या मनस्थितीत नसल्याचे समोर येत आहे. यामुळे पुन्हा एकदा शिंदे गट आणि ठाकरे गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT