Pandharpur : उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटलांच्या मागणीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज सायंकाळी आंदोलनस्थळी त्यांची भेट घेणार असल्याची शक्यता आहे. अशातच ठाकरे गटाचे नेते, माजी मंत्री अनिल परब यांनी जरांगेच्या आंदोलनाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
"जरांगे पाटलांचे उपोषण हे मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी नव्हते तर मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावे, या मागणीसाठी आहे," असे विधान परबांनी पंढरपुरात केले आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे.
वंशावळ न पाहता सरसकट कुणबी दाखले मिळावेत, अशी त्यांनी मागणी केली. सामाजिक,आर्थिक मागासलेपण सिद्ध झाले पाहिजे. इम्परिकल डाटा जमा झाला पाहिजे. त्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. कुणबी विरुद्ध मराठा, मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण केला जात असल्याचा आरोप परब यांनी केला.
एकनाथ शिंदे, अजित पवार हे जालन्यात जाऊन जरांगेंना उपोषण सोडण्याची विनंती करणार असल्याची माहिती आहे. चंद्रकांत पाटीलदेखील जालन्यात जाणार आहेत. चंद्रकांत पाटील हे मराठा आरक्षणासाठी नेमलेल्या समितीचे प्रमुख आहेत.
जरांगे पाटील आणि सरकारमध्ये होणाऱ्या बैठका या सपशेल अपयशी ठरताना पाहायला मिळत आहेत. सरसकट सर्व मराठ्यांना कुणबी जातप्रमाणपत्र द्या, या मागणीवर जरांगे पाटील ठाम आहेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी माझ्या उंबऱ्यालाही शिवणार नाही, अशी भूमिका जरांगे यांनी स्पष्ट केली आहे.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.