Aaditya Thackeray 2 Sarkarnama
मुंबई

Aaditya Thackeray : उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार? आदित्य म्हणाले, 'बिनशर्ट...'

ShivSenaUBT Party MLA Aaditya Thackeray Sakal Media Group Mumbai : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'काॅफी वुईथ सकाळ'मध्ये गप्पा मारल्या.

Pradeep Pendhare

Mumbai News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाच्या युवासेनेचे प्रमुख तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? या प्रश्नावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याच्या राजकारणात शिवसेना उद्धव ठाकरे सेना आणि मनसेची चांगलीच पडझड झाली आहे. यामुळे उद्धव अन् राज यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आलं पाहिजे, अशा चर्चा होत आहे. यातच आदित्य ठाकरे यांनी उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या प्रश्नावर मोठे विधान केले आहे.

आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) म्हणाले, "काही विषय समजण्यापलीकडे असतात. गेल्या दोन वर्षांपासून आमचा लढा सुरू आहे. आम्ही भूमिका बदलेली नाही. हुडी-बिडी घालून, रात्री-अपरात्री आम्ही कोणाला भेटायला गेलेलो नाही. आम्ही सर्वांसमोर मुख्यमंत्र्यांना भेटतो. सर्व मागण्या माध्यमांसमोर मांडतो". पण काही पक्ष 'बिनशर्ट' पाठिंबा देतात. कधी स्वबळावर लढतात. कधी मतदानातील घोळावर बोलतात. तर कधी बैठका घेतात. कितीही पडझड होऊ द्या किंवा करू द्यात, आम्ही आमचा विचार सोडणार नाही. भूमिकेत सातत्य हवे. पण तेच होत नाही, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

भाजपकडून ऑफरर्स..?

भाजपकडून (BJP) युतीच्या काही ऑफर येतात का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "मध्ये-मध्ये ऑफरर्स येत असतात. पण आमची भूमिका ठाम आहे. देश, लोकशाही, संविधान, महाराष्ट्र वाचवण्याची, जपण्याची भूमिका जोपर्यंत ते बोलवून दाखवत नाही, तोपर्यंत ते शक्य नाही".

भाजपने भूमिका सांगावी

भाजपबरोबर समझोता कधी होईल का? तशा काही चर्चा होतात का? यावर आदित्य ठाकरे म्हणाले, "भाजपने कितीही आम्हाला पाडायचा, फोडायचा प्रयत्न तयार करा. पण आम्ही महाराष्ट्रासाठी लढणार आहोत. कितीही वार केला तरी आमचा महाराष्ट्राचा आवाज रोखणार नाही. पण जोपर्यंत महाराष्ट्राच्या हिताचे बोलत नाहीत. तोपर्यंत समझोता नाही".

महाराष्ट्र हित सांगा

'कधीकधी त्यांच्याकडून पुढाकार घेतला जातो. मात्र महाराष्ट्राच्या हिताचा विचार नाही, देश, संविधान, लोकशाही जपली जाईल, असे सांगितले जात नाही, तोपर्यंत काही गोष्टी शक्य होणार नाही', असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

40 चोर शिवसेनाप्रमुखांची भूमिका सांगतात

'40 चोर पळवून नेले. त्यातील काही निर्लज्ज लोक मोठ्या साहेबांची भूमिका मांडत आहे. त्यांनी कधी साहेबांसोबत कामही केलं नाही. ते त्यांची भूमिका मांडत आहेत. आमचा लढा सुरूच राहणार आहे. कधी ना कधी लोकं न्याय करतील. तुम्हाला पळून जावं का लागलं? ते पण गुजरातलाच का जावं लागलं? याचे उत्तर द्यावे लागतील', असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT