MLA Bhaskar Jadhav Sarkarnama
मुंबई

Walmik Karad surrender news : फडणवीस-मुंडेंनी घडवलेले नाट्य तर नाही ना? भास्कर जाधवांना वेगळाच संशय

ShivSenaUBT Party Mumbai MLA Bhaskar Jadhav Walmik Karad Beed Santosh Deshmukh murder Pune CID : वाल्मिक कराड पुणे 'सीआयडी'समोर शरण येताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांची मोठी प्रतिक्रिया.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून, हत्या झाली. या हत्येने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, त्यावरून राजकारण पेटलेले आहे. बीडचे नेते मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्याभोवती यावरून संशयाची राळ उठलेली दिसते.

तेव्हापासून पसार असलेला वाल्मिक कराड हा आज पुणे सीआयडीला सरेंडर झाला आहे. यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांची मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

दोन कोटी रुपयांच्या खंडणीचा दाखल गुन्ह्यात वाल्मिक कराड हा आज पुणे (PUNE) सीआयडी कार्यालयात आज सरेंडर झाला. त्याच्या शरणागतीमुळे राज्याचे राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघू लागले आहे. आरोप आणि संशयाचा धुरळा उडू लागला आहे. वाल्मिक कराड याच्या शरणागतीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली.

"वाल्मिक कराड स्वतःहून शरणागती घेतो, इतका दिवस तो पोलिस आणि सीआयडीला सापडत नव्हता, सर्व काही संशयास्पद आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांची काल सह्याद्री अतिथीगृहावर भेट झाली. तिथं या दोघांमध्ये प्रदीर्घ, अशी चर्चा झाली. कालची ही चर्चा आणि आज वाल्मिक कराड याचे सरेंडर म्हणजे, हे घडवलेले नाट्य तर नाही ना?", असा आमदार भास्कर जाधव यांनी प्रश्न उपस्थित करत वेगळाच संशय व्यक्त केला आहे.

संतोष देशमुख यांची हत्या होऊन 22 दिवस झाले. या हत्येत तीन आरोपी अजून पसार आहे. नागपूर विधिमंडळात आमदार संदीप क्षीरसागर यांनी या घटनेत पहिल्यांदा वाल्मिक कराड यांचे नाव घेतले. 11 डिसेंबरला मध्यप्रदेशाला उज्जैन इथं होता. 13 डिसेंबरपर्यंत समाज माध्यमांवर कार्यरत होता. त्यानंतर वाल्मिक कराड हा बेपत्ता झाला. त्यानंतर तो आज सीआयडीच्या पुणे कार्यालयात सरेंडर झाला. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर संतोष देशमुख कुटुंबियांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

वाल्मिक कराड पुणे सीआयडी कार्यालयासमोर सरेंडर झाल्यानंतर सह्याद्री अतिथीगृहावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्यापाठोपाठ आमदार सुरेश धस देखील सह्याद्रीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. संतोष देशमुख हत्याप्रकरणात या दोघांनी सुरवातीपासून आवाज उठवला आहे. वाल्मिक कराडचे याचे सूचक नाव घेत आहेत. त्यामुळे या भेटीला आता महत्त्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT