Santosh Deshmukh murder case : मुंडेंच्या मंत्रि‍पदावर न्यायालय घेणार निर्णय? धनंजय देशमुखांची वाल्मिक कराडबाबत 'मोठी' मागणी

Dhananjay Deshmukh Beed sarpanch Santosh Deshmukh Bombay High Court ministers Dhananjay Munde Walmik Karad : मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणाचा तपास योग्य तपास व्हावा यासाठी त्यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांची औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल.
Ministers Dhananjay Munde 1
Ministers Dhananjay Munde 1Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास राजकीय दबावविरहित, वेगानं तसंच योग्य होण्यासाठी त्यांचे धाकटे बंधू धनंजय मुंडे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केली आहे.

वकील शोमितकुमार व्ही. साळुंके यांच्यामार्फत ही याचिका दाखल केली असून, वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत मंत्रिपदाबाबत मोठी मागणी केली आहे.

सरपंच संतोष देशमुख यांचे 21 दिवसापूर्वी अपहरण करून हत्या झाली. या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्य हादरले असून, जयराम चाटे, महेश केदार, प्रतीक घुले, विष्णू चाटे या चौघांना अटक केली आहे. तसेच या प्रकरणात मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराड याचेही नाव राजकीय नेते घेत आहेत. त्याच्यावर सध्या खंडणीचा गुन्हा दाखल आहे. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचा निकटवर्तीय आहेत. या हत्याकांडाचे पडसाद विधिमंडळात देखील उटमले असून, तपास सीआयडी करत आहे.

Ministers Dhananjay Munde 1
Suresh Dhas Press Conference : '...यात 'आका'चा 'आका' सापडू नये'; आमदार धस यांनी कोणासाठी केली प्रार्थना?

21 दिवसांपूर्वी झालेल्या या हत्याकांडात अनेक गोष्टींची उकल होणे बाकी असून, सीआयडी करत असलेल्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप होऊ नये, यासाठी आणि तपासाला योग्य दिशा मिळावी, यासाठी मयत संतोष देशमुख यांचे धाकटे बंधू धनंजय देशमुख यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Court) औरंगाबाद खंडपीठात क्रिमिनल रिट पिटीशन दाखल केली आहे.

Ministers Dhananjay Munde 1
Santosh Deshmukh Murder Case : वाल्मिक कराड याचं लोकेशन सापडलं; 'सीआयडी'ची नऊ पथके मागावर

या याचिकेत धनंजय देशमुख यांनी बीड जिल्ह्यातील एकंदरीत गुन्हेगारी नेटवर्क यांचे सर्व पाळेमुळे, त्याचे राजकीय लागेबांधे तथा जिल्हा प्रशासनात होणारा राजकीय हस्तक्षेप, संघटीत गुन्हेगारीला मिळणारा राजकीय वरदहस्त तथा हस्तक्षेप कमी व्हावा यांच्याबद्दल ठोस कार्यवाही करण्याचा निर्देश राज्य सरकारच्या गृह मंत्रालयाचे मुख्य सचिव आणि पोलिस प्रमुखांना द्यावे, अशी मागणी केली आहे.

वाल्मिक कराडवर कारवाईची मागणी

मयत सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली. अपहरण करून क्रूरपणे हत्या झाली. या हत्याकांडात सर्वच्या सर्व गुन्हेगारांना अटक झालेली नाही. या हत्याकांडाचा मास्टरमाइंड ज्याचे नाव पुरवणी जवाबमध्ये कंप्लेंटने दिलेले आहे आणि ज्याच्यावर यापूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल आहे, तो मास्टरमाईंड म्हणजे वाल्मिक बाबुराव कराड याच्या अटकेसंदर्भात योग्य तो तपास करावा. वाल्मिक याच्यावर मोकाका, हत्या करणे, कट करणे, अपहरण करणे या कलमान्वये अंतर्गत कारवाई करावी.

बीडमधील गुन्हेगाराला राजाश्रय

बीड जिल्ह्यात यापूर्वीच्या अनेक प्रकरणी गुन्हेगारी विश्वाला मिळणारा राजाश्रय, मदत तथा हस्तक्षेप याला कारणीभूत असणारे महाराष्ट्र सरकारमधील कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांना मंत्रीपदावरून तात्काळ हटवावे. संपूर्ण तपास हा निष्पक्ष व्हावा, यात कुठलाही राजकीय हस्तक्षेप असू नये. वाल्मिक कराड आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यामधील असणारे निकटचे संबंधांवर देखील याचिकेत लक्ष वेधले आहे.

मुंडेंच्या मंत्रि‍पदाबाबत निर्णय घ्या...

वाल्मिक कराड आणि मंत्री मुंडे यांचे समाज माध्यमांवरील फोटो, व्हिडिओ तसेच व्यावसायिक भागीदारी संबंधित दस्तऐवज, याशिवाय मुख्यतः विधानसभेतील या हत्याकांडासंदर्भात भाजप आमदार सुरेश धस, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार नमिता मुंदडा आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सखोल भाषणाचा पुरावा म्हणून अवलोकन करून न्यायालयाने तपासाबाबत आदेश पारित करावा. तसेच मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे सहकार्य पाहता अपहरण व हत्येच्या तपासात कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव होणार नाही, यासाठी राज्य सरकारमध्ये मुंडे यांना कॅबिनेट मंत्रि‍पदापासून दूर ठेवावे, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com