Mumbai News : मुंबईत मतचोरीच्या विरोधात महाविकास आघाडी- मनसे-डावे पक्ष रस्त्यावर उतरले आहेत. मुंबईत शनिवारी दुपारी एकपासून सत्याचा मोर्चा निघणार आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणार आहे. त्यासोबतच इतर विरोधी पक्षाचे नेतेही ही पोहचणार आहेत. या मोर्चाची राज्यभरात चर्चा सुरू असतानाच आता मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मतचोरीवरील भूमिकेने भाजपला धक्का दिला आहे. महायुतीच्या मित्रपक्षांनेच विरोधकांच्या सूरात सूर मिसळले आहेत.
मोर्चाला आमचा विरोध नाही : संजय शिरसाट
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif), एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. निवडणुकीच्या काळामध्ये अनेक बाबी या समोर येत असतात, त्यामध्ये ही एक नवीन, बोगस मतदार यादी आहेत, एका यादीमध्ये अधिक नाव आहेत, असे काही काही पक्षांचे मत आहे. आज त्यांनी जो मोर्चा काढला आहे, त्याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल, या मोर्चाला आमचा विरोध नाही, असे वक्तव्य मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे.
बोगस मतदार याद्या एकाच मतदारसंघात नाहीत, तर महाराष्ट्रमध्ये आहेत, ही सर्व घाण थांबली पाहिजे असे सर्व नागरिकांचे मत आहे. जो मतदानाला जात नाही त्याच्या नावावर मतदान होते, त्यावेळी आश्चर्याचा धक्का बसतो. हा कोणता पक्ष करतो किंवा कार्यकर्ता करतो या वादात आता मी जात नाही. परंतु हे नसावे या मताचे आम्ही सुद्धा आहोत, असे मोठे वक्तव्य मंत्री शिरसाट यांनी केले. या मोर्चावरही त्यांनी तोंडसुख घेतले. ही स्टंट बाजी आहे, आणि यापूर्वी ते निवडणूक आयोगाला भेटले होते. लोकांना रस्त्यावर आणण्याचे कारण काय हे तेच त्यांनाच माहीत आहे. यासाठी मुंबईच्या लोकांना वेठीस धरणं योग्य नाही असा आम्हाला वाटतं, असे शिरसाट (Sanjay shirsat) म्हणाले.
याद्या दुरुस्त करण्यास आमची काहीही हरकत नाही : हसन मुश्रीफ
काही दिवसापूर्वी झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे काय झाले हे आपण पाहिले आहे. सत्याचा मोर्चा म्हणून हा मोर्चा काढला जात आहे. पण ज्यावेळी मतदारांची कच्ची यादी तयार होते. त्यावेळी ही बाब निदर्शनास आणून देणे गरजेचे होते. पण ती संधी विरोधकांनी गमावली होती. कितीही यंत्रणा असली तरी आपल्या देशाची लोकसंख्या आज 140 कोटींपेक्षा अधिक आहे. त्यातील 20 टक्के सोडले तर बाकीचे मतदार आहेत.
मतदार यादीमध्ये काही चुका होतात. त्यावेळी विरोधकांनी आक्षेप घेतला नाही. या चुका प्रशासन दूर करेलच. आजचा मोर्चा जर त्यासाठी असेल तर आमच्या सगळ्याच पक्षांचा सदोष मतदार याद्यांवर निवडणुका घेण्यास आक्षेप आहे. या याद्या दुरुस्त करण्यास आमची काहीही हरकत नाही, असे वक्तव्य हसन मुश्रीफ यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.