Mumbai Bus Accident: मुंबईतील कुर्ला बेस्ट बसच्या भीषण अपघातात आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री (ता.09) एलबीएस मार्गावरील मार्केटमध्ये भरधाव वेगाने आलेल्या बेस्ट बसने अनेक वाहनांना आणि नागरिकांना धडक दिली.
या धडकेत 6 जणांचा आपला जीव गमवावा लागला आहे. तर 30 ते 35 जण गंभीर जखमी झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातग्रस्त बसमध्ये 60 प्रवासी असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. बस चालक संजय मोरे याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्यावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तर आता या संपूर्ण धक्कादायक आणि अंगावर काटा आणण्याऱ्या अपघाताचं (Accident) सीसीटीव्ही (CCTV) फुटेज समोर आलं आहे. या सीसीटीव्हीत अनेकांना चिरडल्याचे दिसत आहे. यामध्ये कुर्ल्याहून अंधेरीकडे जात असलेल्या बसने एलबीएस रोडवर अनेकांना धडक दिल्याचं पाहायला मिळत आहे.
तर या अपघातात आफ्रीन अब्दुल सलीम शहा, अनम शेख, फातिमा गुलाम कादरी, शिवम कश्यप आणि विजय विष्णू गायकवाड यांच्यासह आणखी 2 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, कुर्ला अपघातस्थळाची फॉरेन्सिक टीमकडून पाहणी करण्यात आली आहे. चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे ही बस मार्केटमध्ये घुसल्याची माहिती आहे. मात्र या अपघाताचं नेमकं कारण पूर्णपणे स्पष्ट झालं नसल्याचं पोलिसांनी (Mumbai Police) सांगितलं आहे.
बेस्टची 332 नंबरची बस कुर्ल्याहून अंधेरीकडे जात होती. ही बस कुर्ला रेल्वे स्थानकातून अंधेरीला जात असताना बसवरचं नियंत्रण सुटलं. यावेळी बसनं पादचाऱ्यांना आणि काही वाहनांना चिरडलं आणि त्यानंतर थेट ती बस एका सोसायटीत घुसली. या बसने दिलेल्या धडकेत जवळपास 5 जणांचा जगीच मृत्यू झाला आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे या बसमध्ये जवळपास 60 प्रवासी असल्याचंही सांगितलं जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.