Amol Mitkari  Sarkarnama
मुंबई

विधानपरिषद निवडणुकीत तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले; मिटकरींचा धक्कादायक दावा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Legislative Council Election) एका पक्षाचे तीन आमदार २१ कोटी रुपयांमध्ये फुटले असल्याचा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केला. प्रत्येक आमदाराला ७ कोटी रुपये दिले असल्याचा दावा त्यांनीही त्यांनी केला आहे. मिटकरी यांच्या वक्तव्यानंतर हे तीन आमदार नेमके कोण आहेत या बाबत राजकीय वर्तुळाच चर्चा सुरु झाल्या आहेत.

मिटकरी म्हणाले, सध्या जमिनीची किंमत पाच लाख रुपये आहे. चार एकर जमीन विकली तर २० लाख रुपये मिळतात. इकडे आमदारांची मते वळवण्यासाठी एका आमदाराला सात-सात कोटी रुपये द्यावे लागतात. उमेदवारासाठी जो घोडेबाजार आहे तो धक्कादायक आहे. आम्हालाही इतर पक्षांकडून गटनेते पदाची ऑफर देण्यात आली होती. या बदल्यात एक मर्सडिज, दोन लाख रुपये महिना, वर दोन खोकी, अशी ऑफर होती, असेही मिटकरी म्हणाले.

शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका

दीड महिन्यापेक्षा जास्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस सरकार टिकणार नसल्याचा दावा मिटकरी यांनी केला. दीड महिन्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल. त्यामुळे मध्यवर्ती निवडणुका झाल्या तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील एक नंबरचा पक्ष असेल, अशा विश्वासही मिटकरी यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT