पुणे : मांजरीचे माजी उपसरपंच पुरुषोत्तम ऊर्फ अण्णा धारवाडकर (Purushottam Dharwadkar) यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना झाली. काल (बुधवारी) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. यात धारवाडकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
याप्रकरणी धारवाडकर यांनी हडपसर (पुणे ) पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी नंदू शेडगे, चंद्रकांत घुले व त्यांच्या तीन मित्रांवर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना मांजरीमधील श्रीराम हॉटेलमध्ये रात्री साडेनऊ वाजता घडली.
आपल्या मित्रासोबत पुरुषोत्तम धारवाडकर हे रात्री हॉटेलमध्ये जेवणासाठी आले होते. त्यांच्या टेबलवर बसलेल्या संजय झुरंगे याचे चंद्रकांत घुले याच्याबरोबर भांडणे झाले. धारवाडकर यांचा त्याच्याशी काही संबंध नव्हता. भांडणानंतर घुले याने फोन करुन साथीदारांना बोलावून घेतले. धारवाडकर जेवण करुन हॉटेलमधून बाहेर पडत असताना तिघे जण एका दुचाकीवरुन तेथे आले.
त्यांच्यातील एकाने धारवाडकर यांच्या दिशेने गोळीबार केला. धारवाडकर हे यातून बचावले. त्यानंतर त्यांच्यावर विटा आणि दगडांनी हल्ला करुन मारेकरी पळून गेले. धारवाडकर यांच्या डोक्यात दगड लागल्याने ते गंभीर जखमी झाले. हडपसर पोलिसांनी खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
"या भांडणाशी आपला काही संबंध नव्हता. चंद्रकांत घुले व नंदू शेडगे हे ओळखीचे असून त्यांच्या मित्रांनी केलेल्या मारहाणीमुळे डोक्याला जखम झाली आहे," असे धारवाडकर यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.