Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

MP Shrikant Shinde : कार्यक्रम डोंबिवलीत तरी श्रीकांत शिंदेंची दांडी!

Bhagyashree Pradhan

Dombivli Political News : डोंबिवली या सांस्कृतिक शहरात ग्लोबल कोकण महोत्सवाला आजपासून सुरवात झाली आहे. पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सांगता 30 जानेवारी रोजी होणार आहे. विशेष म्हणजे आज उद्घाटन झालेल्या ग्लोबल कोकण महोत्सवाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे स्वागताध्यक्ष आहेत. परंतु, पहिल्याच दिवशी त्यांची अनुपस्थिती सर्वांना प्रकर्षाने जाणवली.

डोंबिवलीतील ग्लोबल कोकण महोत्सवाचे उद्घाटन शिंदेंच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे यांनी केले. वास्तविक दरवर्षी ग्लोबल कोकण महोत्सव मुंबईतील गोरेगावच्या नेस्को मैदानात केले जाते. त्यासाठी महाराष्ट्र सरकार सहकार्य करत असते. मात्र, यंदा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईऐवजी डोंबिवलीत (Dombivli) हा महोत्सव हायजॅक केल्याची चर्चा आहे. कार्यक्रम डोंबिवलीत आणला तरी स्वागताध्यक्ष श्रीकांत शिंदेंची (Shrikant Shinde) उद्धाटनाला दांडी हे सर्वांच्या लक्षात आली आहे.

खासदार शिंदे आहेत कुठे?

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे सध्या लोकसभा निवडणुकीमुळे खूप बीझी आहेत. महायुतीची जागावाटपासंदर्भातील बैठक दिल्लीत होत असल्याची चर्चा आहे. तसेच सध्या मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) देखील मुंबईच्या वेशीवर, नवी मुंबईत मराठा आरक्षणासाठी ठाण मांडून बसले आहेत. त्यामुळे या कार्यक्रमाला येऊ न शकल्याची चर्चा आहे.

उद्घाटन खासदार करतील...

शिवसेनेचे कल्याण जिल्हाध्यक्ष गोपाळ लांडगे (Gopal Landge) यांनी उद्घाटन केले असले तरी औपचारिक उद्घाटन खासदार शिंदे करतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तरीही गोपाळ लांडगे यांच्या आगमनानंतर ग्लोबल कोकण महोत्सवाला सुरुवात झाली आहे.

पुस्तक आदान-प्रदान

ग्लोबल कोकण महोत्सवाच्या जवळच श्रीकांत शिंदे फाऊंडेशन आणि पै फ्रेंड लायब्ररी यांनी पुस्तक आदान-प्रदान कार्यक्रम आयोजित केला आहे. १९ जानेवारीला सुरू झालेल्या या उपक्रमाची सांगता २८ जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमाकडेही खासदार श्रीकांत शिंदे अजून फिरकलेले नाहीत.

श्रीकांत शिंदे केव्हा येणार?

या दोन्ही कार्यक्रमांसाठी खासदार श्रीकांत शिंदे उद्या येणार असल्याचे सांगण्यात येते. परंतु, ते येतीलच याची खात्री कुणीही देत नाही.

(Edited by Avinash Chandane)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT