Deepak Kesarkar News : ...तर जिल्ह्यात 1 लाख रोजगार निर्मिती ; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकरांचा दावा

Proceedings to implement the project 'Gems and Jewelery Park' : 'जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क' हा प्रकल्प एक वर्षात कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही.
Deepak Kesarkar
Deepak KesarkarSarkarnama
Published on
Updated on

Deepak Kesarkar News : महापे येथील 'जेम्स ॲण्ड ज्वेलरी पार्क' हा प्रकल्प एक वर्षात कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे नवीन गुंतवणूक होणार असून एकूण 1 लाख रोजगार निर्मिती होईल तसेच दुप्पटीने निर्यात वाढणार आहे. यामुळे जिल्ह्यातील बेरोजगार युवक - युवतींसाठी ही मोठी संधी आहे, असे मत शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी शुक्रवारी ठाण्यात बोलताना व्यक्त केले. Deepak Kesarkar News

75व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ठाणे येथील साकेत पोलीस परेड मैदानावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते ध्वज फडकविण्यात आला. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. 2047 पर्यंत भारताला आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनविण्याच्या संकल्पास कृतिशील सहकार्य करण्याचे प्रधानमंत्री मोदींनी आवाहन केले आहे.

Deepak Kesarkar
Manoj Jarange Speech : किती मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळणार? जरांगेंनी भुजबळांना थेट आकडाच सांगितला

याशिवाय देशाला महासत्ता बनविण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी महाराष्ट्राचेही योगदान असावे. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे सुपुत्र एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन अहोरात्र काम करीत असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी मराठी भाषेचा स्वाभिमान जपण्यासाठी तुम्ही - आम्ही सर्वांनी मिळून विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे. तसेच येणारे वर्ष हे निवडणुकांचे वर्ष असणार आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला संविधान दिले. लोकशाहीचे कटाक्षाने पालन करणारा देश अशी आपल्या भारत देशाची ओळख आहे.

ठाणे जिल्ह्यात एकूण 63 लाख 92 हजार 520 मतदार आहेत. तर, लोकशाही अधिक बळकट आणि विश्वासार्ह करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी, युवा मतदारांनी मतदान करावे आणि आपल्या राष्ट्रीय कर्तव्याचे पालन करावे, असे आवाहन केसरकर यांनी यावेळी केले. राज्य शासन व जिल्हा प्रशासनाकडून ठाणे जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांकडून नाविन्यपूर्ण उपक्रम, योजनांच्या माध्यमातून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न नक्कीच केला जाईल.

यासाठी आपण सर्व एकजुटीने लोकाभिमुख काम कराल, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. तसेच 'कौशल्य केंद्र आपल्या दारी' या संकल्पनेतून 289 नामांकित उद्योजकांसमवेत केलेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून 2 लाख 7 हजार रोजगार उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी वेळी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, पोलीस सहआयुक्त दत्तात्रय कराळे, विशेष महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने उपस्थित होते. याप्रसंगी पोलीस दलाच्या पथकाने राष्ट्रीय ध्वजास मानवंदना दिली तसेच यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताची धून वाजविण्यात आली.

(Edited by Amol Sutar)

Deepak Kesarkar
Sangli Politics : अमरसिंह देशमुख यांच्या मनात नक्की चाललंय काय ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com