Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde On Sanjay Raut : काही लोकांना वेड लागलंय; श्रीकांत शिंदेंचा ठाकरे, राऊतांवर पलटवार

Eknath Shinde Vs Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंना हिंदुत्व सोडण्याचे परिणाम भोगावे लागत आहेत...

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच, असा निकाल विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दिला. त्यानंतर शिवसेनेतील घराणेशाही संपली, हा लोकशाहीचा विजय असल्याचे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केले. त्याला त्यावर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊतांनी श्रीकांत शिंदेंचे नाव घेत सडेतोड उत्तर दिले होते. यावर चिडलेल्या श्रीकांत यांनीही ठाकरे आणि राऊतांवर जशास तसे प्रत्युत्तर दिले.

निकालानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी (Eknath Shinde) ठाकरेंवर घराणेशाही, हुकूमशाहीचा आरोप केला होता. त्यावर संजय राऊतांनी घराणेशाही संपवली, म्हणता तर श्रीकांत शिंदे तुमचे पुत्र नाहीत का, असा सवाल विचारला. वडील आमदार, मुख्यमंत्री आणि मुलगा खासदार ही घराणेशाही नाही का? पक्षात आणि मतदारसंघात काही योगदान नसतानाही लोकसभा निवडणुकीत पक्ष आणि माझा मुलगा म्हणूनच मुख्यमंत्र्यांनी मुलासाठी मते मागितली होती, याचीही आठवण राऊतांनी करून दिली.

राऊतांच्या टीकेनंतर (Shrikant Shinde) श्रीकांत शिंदेंनीही पलटवार केला आहे. ते म्हणाले, 'काही लोकांना फ्रस्ट्रेशन आले आहे. काही लोकांना वेड लागले आहे. प्रत्येकाच्या प्रश्नाला उत्तर न दिलेले बरे असते. अध्यक्षांनी दिलेला निकाल लोकशाहीच्या बाजूने आहे. पक्ष ही कोणाची प्रायव्हेट प्रॉपर्टी नाही. पक्ष चालवताना कार्यकर्ते, खासदार, आमदारांना घेऊन बरोबर जावे लागते. पक्षामध्ये फक्त एकाने ठरवले तसे काही होत नाही.'

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पक्षात एकाधिकारशाहीने घटनाबदल केल्याचा आरोपही श्रीकांत यांनी यावेळी केला. ते म्हणाले, 'पक्षाची घटना कशा पद्धतीने बदलली, याकडे अध्यक्षांनी लक्ष वेधले. घटना बदलल्यानंतरही त्याबाबत निवडणूक आयोगाला कल्पना दिली नसल्याचेही अध्यक्षांनी नमूद केले आहे. आता विरोधात निकाल गेल्यामुळे शंभर टक्के सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांना शिंदेसाहेबच दिसतात.'

मुख्यमंत्री शिंदेंच्या कामाने प्रेरित होऊन अनेकजण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचेही श्रीकांत शिंदेंनी स्पष्ट केले. ते म्हणाले, 'आता शिवसेनेत मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते प्रवेश करीत आहेत. येणाऱ्या काळातही आणखी 'इमकमिंग' सुरू राहणार आहे. हे 'उबाठा' पक्षाचे अपयश आहे. उद्धवसाहेबांनी हिंदुत्व सोडण्याची भूमिका घेतली, हा त्याचा परिणाम त्यांना भोगावा लागत आहे. अध्यक्षांनी दिलेला निकाल बाळासाहेबांच्या विचारांच्या बाजूंचा आहे. त्यामुळे राऊत काय बोलतात, त्याला सिरीयसली घेऊ नका, आम्हीही घेत नाही,' असा टोलाही त्यांनी लगावला.

(Edited by Sunil Dhumal)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT