Shrikant Shinde Sarkarnama
मुंबई

Shrikant Shinde Hanuman Chalisa : विरोधकांना उत्तर देण्यासाठी श्रीकांत शिंदेंचं लोकसभेत हनुमान चालीसा पठण

सरकारनामा ब्यूरो

Dombivali Politics: हनुमान चालीसा'वरून महाराष्ट्रात सुरू झालेला संघर्ष आता लोकसभेपर्यंत पोहचला आहे. तोही थेट शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आणि विरोधकांमध्येच. त्याचं झालं काय, मोदी सरकारवरील अविश्वास प्रस्तावावर बोलताना खासदार शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली. या टीकेला उत्तर देताना विरोधकांनी तुम्हाला हनुमान चालीसा येते का विचारले असता शिंदेंनी थेट लोकसभेतच हनुमान चालीसा म्हणून दाखवली. यामुळे प्रकाराची सध्या चर्चा रंगली असून श्रीकांत शिंदेचे चांगलेच कौतुक होत आहे.

काय झालं संसदेत?

काँग्रेसने मणिपूर हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव आणला.अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना श्रीकांत शिंदेंनी विरोधकांवर सडकून टीका केली.शिंदे यांनी हनुमान चालीसाचा मुद्दा उपस्थित करताच विरोधकांच्या बाजूने, 'आवाज आला तुम्हाला हनुमान चालीसा येते का. त्यालाही सडेतोड उत्तर देत खासदार शिंदे यांनी हनुमान चालीसाचे पठण केले.शिवसेना व भाजपा खासदारांनी बाक वाजवत कौतुक केले. "हनुमान चालीसा लोकसभेत घुमली, शिवसेनेच्या डरकाळीने दिल्ली दुमदुमली" असा संदेश देत दमदार खासदार, हिंदुत्ववादी विचारांचे खरे वारसदार या शब्दांत शिंदे यांचे कौतुक शिवसैनिकांकडून करण्यात आले आहे.

श्रीकांत शिंदेंनी यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर गेले. भाजपसोबत निवडणूक लढले आणि खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार बाजूला ठेवून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं. तसेच, महाविकास आघाडी सरकारच्या काळात राज्यातले बुलेट ट्रेन, मेट्रो, समृद्धी महामार्ग या प्रकल्पांमध्ये खोडा घातला. 'आरे'मध्ये कारशेडचा निर्णय रद्द केल्याने मेट्रोचा खर्चही 10 हजार कोटींनी वाढल्याचा आरोप शिंदेंनी यावेळी केला.

“ मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रात हनुमान चालीसा म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबलं.” हे वाक्य उच्चारताच विरोधी बाकांवरुन आवाज आला तुम्हाला हनुमान चालीसा म्हणता येते का? त्यावर श्रीकांत शिंदेंनी, होय, मला पूर्ण हनुमान चालीसा येते असं म्हणत त्यांनी थेट लोकसभेतच संपूर्ण हनुमान चालीसा पठण केली. त्याचवेळी सत्ताधारी शिवसेना आणि भाजपच्या खासदारांनी बाक वाजवत श्रीकांत शिंदेंचं समर्थन दिलं.

पण आता खासदार शिंदेंनी लोकसभेत म्हटलेल्या हनुमान चालीसा पठणची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. शिंदेंच्या हनुमान चालीसा पठणाचे व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. शिवसेना मध्यवर्ती शाखेच्या समोरील रस्त्यावर इंदिरा गांधी चौकात शिवसैनिकांनी बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे डोंबिवलीत शिंदेंचे कौतुक करणारे बॅनरही झळकल्याचे दिसत आहेत.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT