Medha Kulkarni
Medha KulkarniSarkarnama

Medha Kulkarni Breaking News : मेधाताईंच्या नाराजीचा 'चांदणी चौका'वरून 'ब्लास्ट' ; चंद्रकांतदादा, मोहोळांवर उडवला आरोपांचा धुरळा

Pune Political Breaking : भाजप नेत्या आणि माजी आमदार कुलकर्णी यांनी चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी डावलल्याचा आरोप केला आहे.

गणेश कोरे -

Pune : भाजपच्या नेत्या मेधा कुलकर्णीना पक्षात राष्ट्रीय राजकारणात 'मान' आहे; पण त्यांना त्यांच्या जुन्या कोथरूड मतदारसंघातच 'मानापाना' साठी झगडावे लागत आहे. कोथरुडचे नेतृत्व करताना शहराच्या राजकारणावर धाक ठेवून असलेल्या मेधाताईंना आता ना मोदी-शाहांच्या दौऱ्यांचा पासही दिला जातोय, ना त्यांना कुठच्या बैठकांना बोलावले जाते. तरीही, विस्कटलेली राजकीय घडी बसविण्याची मेधाताईंची धडपड कायम आहे.

या धडपडीतून मेधाताईंनी नाराजीचे अस्त्र उपसून, स्थानिक नेतृत्वावर वार करण्याचा पवित्रा घेतल्याचे दिसत आहे. आपल्याला डावलले जात नसल्याचे उघडपणे तेही सोशल मीडियातून बोलून दाखवत मेधाताईंनी एकप्रकारे संतापच मांडला आहे. या नाराजीतून मेधाताईंनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि माजी महापौर मुरलीधर मोहोळांना लक्ष्य केल्याची चर्चा आहे. चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या उद्घाटनाचे श्रेय लाटले गेल्याचा आरोप करत, ्मेधाताईंनी पक्ष नेतृत्वाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न केला आहे.

Medha Kulkarni
Shinde-Fadnavis-Pawar Govt: 'तीन तिघाडा, काम बिघाडा' सव्वा महिन्यांतच शिंदे-फडणवीस अजितदादांमध्ये कुरबुरी ?

भाजप(BJP) नेत्या आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी(Medha Kulkarni) यांनी चांदणी चौक उड्डाणपुलाच्या उद्घाटनप्रसंगी डावलल्याचा आरोप करत सोशल मीडियावर पोस्ट करत आपली जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. कुलकर्णी म्हणाल्या, ‘‘माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही.. पण आता दुःख मावत नाही मनात.. वाटले बोलावे तुमच्याशी असे त्या म्हणाल्या आहेत.

चांदणी चौक( Chandani Chowk ) उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पहिली आणि खूप वाईट वाटले. चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः आदरणीय गडकरी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हणाले की, "तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला असेही कुलकर्णी यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितले.

Medha Kulkarni
Nawab Malik Bail News: जामीन मिळाला नवाब मलिकांना; पण फटाके फुटले अजितदादांच्या ऑफिसबाहेर

अनेक असे संदर्भ देता येतील की ज्यात 'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? मध्यंतरी आदरणीय मोदी जी, आदरणीय अमित शाह जी पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून 'सर्व ठिकाणी' चे पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून, विनंती करूनही मला दिला नाही. साधे कोथरूड च्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणी मध्ये मी अपेक्षित नसेन तर याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे.

गेली अनेक वर्षे मी हे सहन करीत आहे. त्या त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत. देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्यासारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की, माझी काही किंमत नाही आहे. माझ्याबाबत त्यांना असे करणे सोपे जाते असेही

Medha Kulkarni
Rahul Gandhi On Narendra Modi : राहुल गांधींची मोठी खेळी; मोदींच्या भाषणाचं हत्यार वापरत करणार भाजपचाच 'गेम' !

माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली, विचारधारा धरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला. आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे अशी खंतही मेधा कुलकर्णी यांनी बोलून दाखवली.

कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते म्हणत रोख कुणाकडे...

आपल्या पोस्टमध्ये उद्विगणतेने म्हणताना कुलकर्णी म्हणाल्या,‘‘ चांदण चौक उड्डाणपूल आणि इतर विकासकामामध्ये'कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते' या विषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सद्य नेते.. माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
sarkarnama.esakal.com