Siddhivinayak Temple Trust news  sarkarnama
मुंबई

MNS news : फडणवीसांनी ठाकरे गटातील नेत्याच्या चौकशीची घोषणा करताच मनसेकडून बॅनरबाजी..

Siddhivinayak Temple Trust news : 'महिन्याभरात या आरोपांची चौकशी केली जाईल,' असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे

सरकारनामा ब्युरो

Siddhivinayak Temple Trust news : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप शुक्रवारी विधानसभेत करण्यात आला. माहीमचे शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. (Siddhivinayak Temple Trust news)

ठाकरे गटाचे नेते आदेश बांदेकर (adesh bandekar) हे सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. मनसेनेही आदेश बांदेकर यांच्यावर या प्रकरणावरुन हल्लाबोल केला आहे. सिद्धीविनायक मंदीरातील (Siddhivinayak Temple Trust) गैरव्यवहारावरुन सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि ठाकरे गट यांच्याच जुंपली आहे. गेल्या काही दिवसापासून 'डायरी'वरुन रोज आरोप-प्रत्यारोप होत आहेत.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टमध्ये घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी मनसेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. मनसेनं आदेश बांदेकर यांनी केलेल्या भष्ट्राचाराबाबत पुरावे सादर केले आहेत. मनसेने आदेश बांदेकर यांना पत्रकार परिषद घेऊन खुलासा करण्याचे आवाहन केले होते. शुक्रवारी अधिवेशन काळात या विषयावर चर्चा झाली.

'महिन्याभरात या आरोपांची चौकशी केली जाईल,' असं आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. "जर गैरकारभार झाला असेल, तर त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल, असंही फडणवीसांनी सांगितलं. त्यामुळे या मुद्द्यावरून पुन्हा एकदा सत्ताधारी विरुद्ध ठाकरे गट असा सामना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

फडणवीसांनी बांदेकरावर झालेल्या आरोपाबाबत केलेल्या कारवाईबाबत मनसेने सिद्धिविनायक परिसरात आणि शिवाजी पार्क परिसरात मनसेकडून फलक लावले आहेत.

“न्यासाच्या इतर सदस्यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री निधीतून पाच कोटींचा चेक देणं हे गैरव्यवहाराचं लक्षण आहे. २५ हजारांपेक्षा जास्त रक्कम देताना शासनाची परवानगी घ्यावी लागते. मग हा चेक देताना अशी परवानगी न्यासानं घेतली होती का?” असा प्रश्न सरवणकरांनी शुक्रवारी अधिवेशनात उपस्थित केला.

“मार्च २०२०मध्ये ट्रस्टने उत्तर प्रदेशमधील एका कंपनीकडून १५ ते १६ हजार लीटर साजूक तुपाची खरेदी केली. कोरोना काळात लॉकडाऊनदरम्यान मंदिराच्या ट्रस्टींनी हे तूप विकून टाकलं”, असा आरोप सरवणकरांनी केला आहे. “लॉकडाऊननंतर २०२१मध्ये मंदिर पुन्हा खुलं होताच ट्रस्टनं भक्तांना दर्शनासाठी क्यूआर कोड प्रणाली सुरू केली.

या कामासाठी ४०-५० लाखांचा खर्च येत असताना ३.५ कोटींचं कंत्राट ट्रस्टींशी संबधित व्यक्तीला देण्यात आलं. मंदिराच्या पुनर्बांधणी आणि दुरुस्तीच्या कामातही बराच गैरव्यवहार झाला आहे”, असा आरोपही सरवणकरांनी केला आहे.

सिद्धिविनायक न्यास मंदिराकडून दरवर्षी दैनंदिनी डायरी काढते असते परंतु यावर्षी ती निघाली नाही त्याला आदेश बांदेकर जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते, सरचिटणीसचे मनोज चव्हाण यांनी केला आहे. या डायरीवर उद्धव ठाकरे यांचा फोटो हवा असा बांदेकर यांचा अट्टाहास असल्याची माहिती आहे. याला काही विश्वस्तांचा विरोध असल्याचा दावा मनोज चव्हाण यांनी रविवारी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT