Vaibhav Naik Sarkarnama
मुंबई

Nitesh Rane Vs Vaibhav Naik : मंत्री राणे स्वतः ला डॉन समजतात, अन् पोलिसांच्या चार-चार गाड्या घेऊन फिरतात; वैभव नाईकांनी थेट टार्गेट केलं

Shiv Sena Thackeray Vaibhav Naik Sindhudurg BJP Guardian Minister Nitesh Rane police security : सिंधुदुर्ग भाजपचे पालकमंत्री नीतेश राणे यांच्या ताफ्यात असलेल्या पोलिस बंदोबस्तावरून शिवसेना ठाकरे सेना पक्षाचे वैभव नाईक यांची टीका.

Pradeep Pendhare

Maharashtra Politics News : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातील राजकीय संघर्ष संपूर्ण राज्याला माहिती आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत तो शिगेला पोचला होता. विधानसभा निवडणुकीतील यशानंतर राणे पिता-पुत्रांनी शिवसेना ठाकरे पक्षाला अधिकच टार्गेट केले आहे.

पण आता सिंधुदुर्गातील ठाकरे यांचा शिलेदार माजी आमदार वैभव नाईक यांनी मंत्री राणेंना आता भिडायला सुरवात केली आहे. कणकवली शहरात पोलिस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर चोरांनी चार ते पाच दुकाने फोडून केलेल्या चोरीच्या घटनेवरून टायमिंग साधत माजी आमदार नाईक यांनी मंत्री राणे यांच्यावर थेट टीका केली आहे.

भाजप (BJP) पालकमंत्री नीतेश राणे स्वतः ला डॉन समजतात. आणि ते असू शकतील. मात्र त्यांच्याच मतदारसंघात कणकवली शहरात पोलिस ठाण्याच्या हकेच्या अंतरावर असलेली चार ते पाच दुकाने चोरांनी फोडली. पालकमंत्री राणे यांच्या दौऱ्यात पोलिसांच्या चार-चार गाड्या पाठीमागे फिरतात, मग शहराच्या सुरक्षितेकडे कोण पाहणार? असा सवाल वैभव नाईक यांनी केला.

वैभव नाईक यांनी, स्वतःला डॉन समजणाऱ्या नीतेश राणेंना एवढ्या पोलिस (Police) संरक्षणाची गरज काय? असा प्रश्न केला. ते डॉन आहेत, त्यांना संरक्षणाची गरज नाही. त्यापेक्षा पोलिसांनी चोरी, घरफोडी या घटनांकडे लक्ष द्यावे, शहराचे संरक्षण देखील तितकेच गरजेचे आहे, असे म्हटले.

पालकमंत्री राणे यांच्या पाठी, कालपासूनच अर्ध पोलिस ठाणे आहे. असे असताना शहराच्या सुरक्षिततेचे काय? याचा जाब विचारण्यासाठी सोमवारी कणकवली पोलिस ठाण्यात शिवसेनेचे शिष्टमंडळ घेऊन निदर्शने करणार असल्याचा इशारा माजी आमदार वैभव नाईक यांनी दिला आहे.

कणकवली शहरात पोलिस ठाण्याच्या काही अंतरावर चार ते पाच दुकाने चोरांनी फोडली. सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार चित्रीत झाला आहे. पोलिसांकडे याकडे लक्ष नाही. काही दिवसांपूर्वी ओरसच्या टोलनाक्याच्या शंभर मीटर अंतरावर महिलेचा जळलेला मृतदेह टाकण्यात आला. मग पोलिस नेमकं काय करतात? कोणाला संरक्षण देतात? असे सवाल वैभव नाईक यांनी उपस्थित केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT