Gaurav Ahuja Case : शिंदेसाहेबांची आहुजाला वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका? कुणी व्यक्त केली शंका?

Pune Crime CM Devendra Fadnavis Eknath Shinde News : सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करून अश्लील चाळे केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी गौरव आहुजाला अटक केली आहे.
Gaurav Ahuja, Eknath Shinde
Gaurav Ahuja, Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यात भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर लघुशंका आणि स्थानिक नागरिकांना न जुमानता, अश्लील कृत्य करून नंतर आलिशान कारमधून पसार झालेल्या गौरव आहुजाला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेपूर्वी त्याने माफीनाम्याचा व्हिडिओ प्रसारित केला. या माफीनाम्यामध्ये त्याने शिंदेसाहेब असा उल्लेख केल्याने सध्या राजकारण तापले आहे.

आहुजाच्या माफीनाम्या नंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गृहमंत्री फडणवीस असताना आहुजा ने शिंदेंची माफी का? मागितली असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते आणि आपचे नेते विजय कुंभार यांनी देखील शिंदे साहेबांनी आहुजाला वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका वाजवली का? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

Gaurav Ahuja, Eknath Shinde
Gaurav Ahuja arrested : पुण्यात भरदिवसा रस्त्यावर अश्लील चाळे करून फरार झालेल्या गौरव आहुजाला अटक ; माज उतरल्यावर आता म्हणातोय, की...!

सुषमा अंधारे म्हणाल्या, काल शास्त्रीनगर येरवडा भागांमध्ये अश्लील वर्तन करणारा हाच तो गौरव मनोज आहुजा. चहुबाजूने टीका झाल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर गौरव आहुजाने माफी मागणारा आपला हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे. आहूजा करोडपती बापाचा मुलगा आहे. त्यामुळे त्याची माफी बातमीचा विषय होतेय.

एरवी सर्वसामान्य घरातील एखाद्या मुलाकडून साधा सिग्नल जरी मोडला गेला तर पोलिस त्याला पकडून ठेवतात. त्याचा परवाना जप्त करतात, त्याचं वाहन जप्त करतात. गौरव आहुजाच्या बाबत मात्र पोलिसांनी असे काहीही केलेले नाही. कायदा सामान्य लोकांसाठी एक आणि करोडपती लोकांसाठी एक असा आहे का? असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला.

Gaurav Ahuja, Eknath Shinde
Pune Criem News : संतापजनक! रस्त्याच्या मधोमध गाडी थाबंवली, अश्लील चाळे केले; भरधाव वेगाने निघून गेला

आहुजा माफी मागताना राज्याच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाही तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माफी मागतो हे फारच विशेष असल्याचं म्हणत अंधारे यांनी आहुजाच्या माफीनाम्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. विजय कुंभार म्हणाले, “शिंदे साहेब” नेमके कोण? आणि त्यांनी गौरव आहुजाला का वाचवलं? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. “शिंदे साहेब” पुण्याच्या मद्यधुंद बड्या बापाच्या मुलाला वाचवण्यासाठी सूत्र हलवत आहेत का? असा सवाल कुंभार यांनी उपस्थित केला.

कुंभार पुढे म्हणाले ,कालपर्यंत रस्त्यात थांबवलेल्या BMW गाडीतून उतरत सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणारा, स्थानिकांशी गैरवर्तन करणारा, दारूच्या नशेत असभ्य वर्तन करणारा “गौरव आहुजा” आज अचानक माफी मागत फिरतोय! पण प्रश्न हा आहे की “तो माफीस पात्र आहे का?”

आश्चर्याची गोष्ट अशी आहे की, गौरव आहुजा केवळ जनतेची आणि पोलिसांची माफी मागत नाही तर तो विशेषतः “शिंदे साहेबांची” माफी मागतोय! म्हणजे प्रश्न हा आहे की हे “शिंदे साहेब” नक्की कोण? आणि त्यांचा या संपूर्ण प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे? याचा शोध घेणे आवश्यक असल्यास कुंभार म्हणाले.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com