Ashish Shelar, Rahul Narwekar, Pravin Darekar Sarkanrnama
मुंबई

Maharashtra Assembly Session : जरांगे-पाटील यांच्या धमकी प्रकरणाची SIT चौकशी; विधानसभा अध्यक्षांनी दिला आदेश

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या धमकीनंतर या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विधानसभा आणि विधानपरिषदेत करण्यात आली होती.

Avinash Chandane

Maharashtra Politics :

राज्यातील आजची सर्वात मोठी बातमी. विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे-पाटील यांनी दिलेल्या धमकी प्रकरणी एसआयटी (SIT) चौकशीचे आदेश दिले आहे. आज सकाळी अंतरिम बजेट अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले ते जरांगे-पाटील यांच्या धमकी प्रकरणावरून.

त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जरांगे-पाटलांची SIT चौकशी करण्याची मागणी झाली. एवढेच नाही जरांगे पाटलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याचीही मागणी झाली. त्यानंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी SIT चौकशीचे आदेश सरकारला दिले.

विधानसभेत आशिष शेलार आक्रमक

विधानसभेत भाजपचे आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी जरांगे-पाटील यांच्या भाषेवर आक्षेप नोंदवले. जरांगेंनी महाराष्ट्र बेचिराख करण्याची भाषा केली होती. तसेच त्यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर घाणेरडे आरोप करून त्यांच्याबाबत आक्षेपार्ह भाषा वापरली होती, याकडे सरकारचे लक्ष वेधले. त्याचवेळी जरांगे-पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या कटकारस्थानाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असे सांगत, दगडफेकीसाठी कुठल्या खाणीतून दगड आणले, असा सवाल केला आणि या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी (SIT) चौकशीची मागणी केली.

जरांगेंची एसआयटी, ईडी चौकशी करा!

विधानसभेत आशिष शेलार आक्रमक झालेले असताना विधानपरिषदेत प्रवीण दरेकर (Pravin Darekar) संतप्त झाले होते. या कटात कोण कोण सहभागी झाले होते, याची चौकशी व्हायला पाहिजे. दगडफेकीचे नियोजन झाले होते, असा आरोप बारस्करांनी केल्याचा दावाही दरेकरांनी केला. उपमुख्यमंत्री फडणवीसांबाबत जरांगेंनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने जो न्याय नारायण राणेंना लावला होता त्याच न्यायाने जरांगेंवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी दरेकरांनी केली.

एवढेच नाही तर या संपूर्ण प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी. तसेच या आंदोलनासाठी एवढा पैसा कुठून आला, एवढे ट्रॅक्टरसाठी खर्च कुणी केला, याची ईडीकडून (ED) चौकशी व्हावी, अशी मागणीही दरेकरांनी केली.

तो फोन कुणाचा?

जरांगे-पाटील कुणालाही विश्वासात घेत नव्हते, हा आरोप संगीता वानखेडे (Sangita Wankhede) यांनी केल्याचे दरेकरांनी विधानपरिषदेत सांगितले. जरांगेंना एक फोन येत होता, तो म्हणजे शरद पवारांचा, असा आरोप संगीता वानखेडेंनी केल्याचे दरेकरांनी सभागृहात सांगितले.

विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांत जरांगे-पाटील यांच्या धमकी प्रकरणावरून गदारोळ झाला. त्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेचं कामकाज प्रत्येकी पाच मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले होते.

जरांगेंच्या आंदोलनामागे कोण आहे, जरांगे नक्की कुणाची भाषा बोलतात, त्यांच्या आंदोलनाला आर्थिक रसद कोण पुरवतं, कोणकोणते नेते जरांगेंना भेटले होते, यावरून सत्ताधारी आक्रमक झाले होते. त्यानंतर अध्यक्षांनीच या संपूर्ण प्रकरणाची दखल घेत एसआयटी चौकशीचे सरकारला आदेश दिले.

(Edited by Avinash Chandane)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT