बजेटमधून जनतेच्या पदरी निराशा आली आहे. 'कंत्राटदार जोमात, शेतकरी कोमात' असा आजचा अर्थसंकल्प आहे. शिवरायाचं स्मारक कधी होणार, याबाबत कुणी काही बोलत नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आजचे बजेट आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
बजेटमधून राज्याला काहीही मिळाले नाही, स्मारकांच्या पलिकडे बजेटमध्ये काहीच नाही. कर्ज काढून घर चालवलं जाते आहे , शेतकऱ्यांसाठी कुठलीही तरतूद नाही, सत्ताधाऱ्यांनी केवळ स्वत:ची पाठ थोपटून घेतली, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
मते मिळवणे हाच हेतू सरकारचा...
मते मिळवण्यासाठी अजित पवार यांनी हे बजेट सादर केले आहे. स्मारकांसाठी निधी देणे त्यातून मते मिळवणे हाच हेतू सरकारचा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. महाराष्ट्रात खड्ड्यात घालण्याचे काम सरकारचे सुरु आहे, असे वडेट्टीवार म्हणाले. जनतेला विकासाचे गाजर दाखवल जातयं, असे ते म्हणाले.
पोलिस शिपायांची १७ हजार 471 पदे भरण्यात येणार असल्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले. तर अंगणवाडी सेविकांची १४ हजार पदे भरण्यात येणार असल्याते ते म्हणाले. ६ लाख ५२२ कोटींचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.
प्रतापगडाच्या पायथ्याशी जीवा महाले यांचे स्मारक तर सानेगुरुजीची कर्मभूमी असलेल्या अमळनेरला त्यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली.
काश्मीर आणि अयोध्येत महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा अजितदादांनी करताच सभागृहात 'जय श्रीराम'चा जयघोष करण्यात आला.
असंघटीत कामगारांसाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. दिव्यांग विभागाला एक हजार ५२६ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. क्रीडा विभागाला ५३७ अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संस्था सुरुकोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
मांतग समाजासाठी अण्णा भाऊ साठे प्रशिक्षण संस्था सुरु करण्यात येत आहे. बार्टीच्या धर्तीवर आदिवासींसाठी नमो स्मार्ट शाळा अभियान आर्टी संस्था सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली- अजित पवार
वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत शिधा वाटप करताना एका महिलेस 1 साडी देण्याचे काम सुरू आहे. निर्यात वाढीसाठी पाच इंडस्ट्रियल पार्क तयार करण्यात येणार आहे. मेक इन इंडिया धोरणांतर्गत 196 कोटी रुपये निवेदा प्रक्रिया राबवण्यात आली आहे. त्यासाठी मॉल उभारण्यात येणार आहे.
सामान्य प्रशनास विभागास 1 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. 2024 मध्ये दावोस येथे 19 कंपन्यांसोबत करार झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
मुलीच्या सक्षमीकरणासाठी 'लेक लाडकी' योजना सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा अजित पवार यांनी केली. विदर्भातील दुष्काळ दूर करण्यासाठी २०० कोटींची योजना राबविण्यात येणार आहे.
पशुसंवर्धन विभागाला ५०० कोटींची निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. राज्यात २०० सिचन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. मागेल त्याला सौर ऊर्जा देण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
ग्रामविकास विभागाला 9 हजार कोटींचा मंजूर झाला आहे. 300 युनिटपर्यंतची वीज मोफत देण्यात येणार आहे. वीज दर सवलतीचा एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली आहे.
नवी विमानतळाच्या कामाच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. संभाजीनगर विमानतळासाठी ५०० कोटींचा निधी देण्यात आला आहे. राज्यात १८ लघू उद्योग संकल्प उभारण्यात येणार आहे. यामुळे रोजगार निर्मिती होणार आहे.
नगर विकास विभागाला १० हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे. विविध विकासयोजनांची अंमलबजावणी होत आहे. शिर्डी विमानतळाच्या विस्ताराचे काम लवकरच सुरु होणार आहे. राज्यात रेल्वेचं जाळं उभारण्याचा प्रयत्न केला जात आहे.
राज्यातील गुंतवणुकीवर भर दिला जाणार आहे, राज्यात सहा वंदेभारत एक्सप्रेस सुरु करण्यात आल्या. राज्यातील रेल्वेसाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे. नवीन रेल्वे मार्गाची प्रक्रिया सुरु आहे, असे पवार यांनी सांगितले.
११ गड किल्ल्यांना जागतिक वारसा मिळवण्यासाठी प्रस्ताव केंद्राला पाठवला आहे. जुन्नरमध्ये शिवसंग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली
राज्याचा अर्थसंकल्प आज दुपारी दोन वाजता अर्थमंत्री अजित पवार सभागृहात सादर करणार आहेत. अजित पवार विधानभवन परिसरात दाखल झाले असून त्यांच्यासोबत अनिल पाटील, दीपक केसरकर होते. लवकरच मंत्रिमंडळांची बैठक सुरु होत आहे.
“मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप केले आहेत. मागचे 2 ते 6 महिन्यांचे आंदोलन बघितले तर, मनोज जरांगेंनी कधी मुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही. दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले नाही तर, मनोज जरांगेंनी फक्त फडणवीसांवर आरोप का केले? फडणवीसांवर केलेले आरोपाची चौकशी व्हावी, अशी मागणी अंबादास दानवेंनी विधानपरिषदेत केली आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचं व्यवस्थापन गुजरातमधल्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डाकडे द्यावं असा ठराव राज्य सरकारकडे आलेला आहे. महानंद डेअरीला सरकारने अडचणीतून काढायला पाहिजे. महानंदला ताकद देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सांगितले.
नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरुन उठवण्याची एवढी घाई का होती, राणांनी हनुमान चालीसा वाचली, म्हणून त्यांना जेलमध्ये टाकलं, असे सांगत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यपणे उद्धव ठाकरे यांच्यावर यांना टोला लगावला. "कायद्यापेक्षा कुणी मोठा नाही, कुणी खोटं बोलत असेल तर त्याला पाठीशी घालणार नाही," अशी ग्वाही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली.
जरांगेंचशी आमचं काही देणेघेणे नाही. फडणवीसांबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले. त्यांच्यामागे कोण आहे. त्यांची भाषा राजकीय आहे. त्यांची भाषा चुकीची आहे. -मुख्यमंत्री
मराठा आरक्षण टिकणार, असे म्हणणारे कारण देत नाही, सर्वांच्या एकमताने आरक्षण देण्यात आले, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्ही आरक्षण दिले- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
शरद पवार यांच्या सांगण्यानुसार मनोज जरांगे वागत आहे, राजेश टोपे यांच्या कारखान्यांवर दगडफेकीचे सगळे कटकारस्थान रचले गेले. त्यांची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी आमदार प्रविण दरेकर यांनी विधानपरिषदेत केली. जरागेंच्या सभेवर खर्च कोणी केली, जरांगेंना शरद पवारांचे फोन येत होते, असे दरेकर म्हणाले.
जरांगे यांच्यासोबत चर्चा कोण करत होते, त्यांच्या आंदोलनामागे कोण आहेत, हे समोर आले पाहिजे, या प्रकरणाची चौकशी सरकारने करावी, जरांगे राजकारणी नव्हते, त्यांना राजकारणी कोणी केलं, त्यांच्यामागे कोणती शक्ती आहे? असा प्रश्न विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. विधानसभेचे कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही, अशी भाषाही जरांगेंनी वापरली. या सगळ्यात काहीतही कटकारस्थान आहे, महाराष्ट्र बेचिराख होणार होता, मी महाराष्ट्राला वाचवले, असे जरांगे म्हणाले. त्यांची एसआयटी चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी शेलार यांनी केली. त्यांच्या आंदोलनामागे कोणता पक्ष, कोण व्यक्ती आहे, याची चौकशी झाली पाहिजे.
मनोज जरांगे यांची भाषा महाराष्ट्राला बेचिराख करण्यारी आहे. धमकी देण्याची हिंमत जरागें यांच्यामध्ये कुठून आली, असा सवाल भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी उपस्थित केला.
विधानभवनाच्या पायऱ्यावर विरोधकांचे आंदोलन सुरु. महाविकास आघाडीच्या आमदारांनी कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्यावर सरकारला घेरत विधान भवनाच्या पायऱ्यांवर जोरदार निदर्शने केले. यावेळी काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते बाळासाहेच थोरात, विधानपरिषद गटनेते सतेज बंटी पाटील, काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड, भाई जगताप, अभिजित वंजारी, राजेश राठोड, माधवराव पाटील जवळगावकर, जयश्री जाधव, बळवंत वानखेडे, संजय जगताप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सचिन अहिर,नरेंद्र दराडे,वैभव नाईक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे) अनिल देशमुख, यांच्या उपस्थितीत विरोधी पक्षाच्या आमदारांनी राज्यात बिघडलेली कायदा सुव्यवस्थेच्या विरोधात घोषणा लिहिलेले फलक हातात घेत जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.
भाजपकडून अजित पवार यांचा वापर केला जात आहे. पवार विरुद्ध पवार अशी लढत केल्यानं भाजपला त्यांचा फायदा होईल, सामान्य लोक शरद पवार यांच्यासोबत आहे. पवार-विरुद्ध पवार लढाई होऊ नये, असे कुटुंब म्हणून मला वाटतं, असे रोहित पवार म्हणाले.
सामान्य लोक जातीयवादी सरकारचा करेक्ट कार्यक्रम करतील, असेही ते म्हणाले. ठराविक नंबर फोन टॅपिंगसाठी दिले आहेत, असा आरोप त्यांनी केला. "माझाही फोन टॅपिंग होत असेल , अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली, ते विधानभवन परिसरात माध्यमांशी बोलत होते.
अंतरिम अर्थसंकल्प 1 एप्रिल 2024 ते 31 जुलै 2024 या चार महिन्यांच्या आवश्यक खर्चाची तरतूद केली जाईल. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि भत्ते, कर्जाची परतफेड, व्याज आणि लोकसभा निवडणुकीसाठी झालेला खर्च यांचा समावेश आहे.
राज्य सरकारकडून अवघ्या काही तासांत अंतरिम बजेट (Maharashtra Budget 2024 Announcement Live Updates) सादर होणार आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही लोकप्रिय घोषणा केल्या जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.अर्थमंत्री अजित पवार आपल्या पेटाऱ्यातून काय काय बाहेर काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कालच्या पहिल्या दिवशी विधीमंडळात अजित पवारांनी पुरवणी मागण्या सादर केल्या त्यावर आज सकाळच्या सत्रात चर्चा होईल. दुपारी दोन वाजता अजित पवार विधानसभेत राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.