मुंबई

The Cosmos Bank Fraud News : बनावट कागपत्रांद्वारे कॉसमॉस बँकेला सहा कोटींचा गंडा

सरकारनामा ब्युरो

Fraud in The Cosmos Bank : मुंबईतील कल्याण येथील कॉसमॉस बँकेत गृहकर्ज मंजुरीसाठी मध्यस्थीने २५ कर्जदारांची बनावट कागपत्रे सादर केली. त्यातून बँकेची ६ कोटी १२ लाख ६२ हजारांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Mumbai Crime बँकेची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुण्यातील वसुली विभागाचे साहाय्यक महाव्यवस्थापक शरद बेदाडे यांनी तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी कर्ज मंजुरीतील मध्यस्थ शैलेश ताकभाते, योगेंद्र जालंद्र, सचिन पाटील, इस्माईल शेख, दत्ता आव्हाड, विनोद यादव, कागदपत्र छाननी करणारी मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंट कंपनी आणि २५ कर्जदारांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहितीनुसार, या प्रकरणातील मध्यस्थी असलेले आरोप बँकेकडे सतत कर्जमंजुरीसाठी प्रकरणे घेऊन येतात. त्यामुळे संबंधित अधिकारी आणि त्यांच्यात परिचय झाला होता. Scam in Bank दरम्यान कर्ज प्रकरणातील कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बँकेने मे. क्रक्स रिस्क मॅनेजमेंट ही तृतीय पक्ष कंपनी नेमली. त्या कंपनीने संबंधित कर्जदारांचा पडताळणी सुयोग्य असल्याचा अहवाल बँकेस दिला होता. त्यानंतर बँकेने २६ कर्जदारांना सहा कोटीहून अधिक रकमेची कर्जे मंजूर केले होते.

असे आले प्रकरण उघडकीस

कर्ज मंजूर होऊनही बिल्डर घराचा ताबा देत नसल्याने एका कर्जदारांने आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली होती. त्यानुसार या प्रकरणाची चौकशी करण्यात आली. त्यासाठी बँकेच्या अधिकाऱ्यांचीही चौकशी केली. त्यावेळी मध्यस्थ ताकभाते आणि सहकाऱ्यांनी कर्जदारांची बनावट कागदपत्रे तयार केल्याचे उघडकीस आले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT