Viral Rap Song : अश्लील रॅप साँग शूटिंग प्रकरण; पोलीस करणार अधिकाऱ्याची तर अधिसभा सदस्य करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी!

Pune University Viral Rap Song : अश्लील रॅप साँग प्रकरणी विद्यापीठाचा मोठा निर्णय
Pune University Viral Rap Song
Pune University Viral Rap SongSarkarnama

Pune News : पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (Pune University) एका अश्लील रॅप साँगचे शुटींग केल्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी उघडकीस आला आहे. विद्यापीठातील मुख्य इमारतीतच हे अश्लील रॅप साँग शुट केल्यामुळे या प्रकाराची चांगलीच चर्चा झाली.

शुभम जाधव असं रॅप साँग शुट करणाऱ्या मुलाच नाव असून या रॅप साँगसाठी विद्यापिठातील काही कर्मचाऱ्यांनीच तोंडी परवानगी दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता ही परवानगी नेमकी कुणी दिली? याबाबतची चौकशी करण्यात येणार आहे.

Pune University Viral Rap Song
Pune Fraud News : पुण्यात विशाल फटेचा नवा अवतार; गुंतवणूकदारांची सातशे कोटींची फसवणूक, गुन्हा दाखल !

तसेच या रॅप साँग शुट प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Pune University) उच्चस्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. या उच्चस्तरीय चौकशी समितीकडून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.

या समितीमध्ये भाग्यश्री मंठाळकर, प्रसेंजित फडणवीस, निवृत्त कॅप्टन चंद्रशेखर चितळे, डॉ. विलास आढाव यांचा समावेश आहे. या रॅप साँग शुट प्रकरणाची चौकशी करून याबाबतचा अहवाल एक महिन्यात सादर करण्याचे निर्देश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांनी दिले आहेत.

Pune University Viral Rap Song
SPPU Viral Rap Song: रॅप साँगला परवानगी देणाऱ्या विद्यापीठातील अधिकाऱ्याचीच चौकशी होणार

दरम्यान, या रॅप साँग शुट प्रकरणी चतुर्शृंगी पोलीस ठाण्यात शुभमवर गुन्हा दाखल झाला. मात्र, अद्याप त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच आता विद्यापीठात रॅप साँग शुटींगला कुणी परवानगी दिली? त्याच्यांवरही कारवाई करण्याची मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणात नेमकं दोष कुणाचा? हे विद्यापीठाने नेमलेल्या उच्चस्तरीय चौकशी समितीने अहवाल दिल्यानंतरच समोर येणार आहे.

(Edited By Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com