Jayant Patil Sarkarnama
मुंबई

MLC Election Result : शरद पवारांना धक्का? पाठिंबा दिलेल्या जयंत पाटील यांना सर्वात कमी मते

SKP Jayant Patil : जयंत पाटील आणि ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांच्यात लढत असल्याचे मानले जात होते.

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत 80 टक्के स्ट्राईक रेटने भाजपसह महाविकास आघाडीलाही अनपेक्षित धक्का देत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आघाडी घेतली. मात्र शरद पवारांची ही जादू विधान परिषद निवडणुकीत दिसली नाही.

विधान परिषदेत शरद पवारांनी शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना पाठिंबा दिला होता. त्यांना मात्र पहिल्या पसंतीची फक्त 8 मते मिळाली. सर्वात कमी मते पाहून जयंत पाटील यांनी विधिमंडळातून काढता पाय घेतला.

विधान परिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे एकूण 12 उमेदवार रिंगणात होते. दोन्ही गटांकडून आमचे सर्व उमेदवार निवडून येणार, असा दावा केला जात होता. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार होता, मात्र तो नेमका कोणाचा हे निकालानंतरच स्पष्ट होणार होते.

ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकरांना रिंगणात उतरवले आणि विधान परिषदेची निवडणुकीत रंगत आली. नार्वेकर आणि जयंत पाटील हे महाविकास आघाडीचे उमदेवार असल्याचे वारंवार सांगितले जात होते. तसेच सत्ताधाऱ्यांची मते फुटतील आणि महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील असा विश्वासह आघाडीतील नेते व्यक्त करत होते. आता मात्र शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील पराभवाच्या छायेत असल्याचे चित्र दिसत आहे.

या निवडणुकीत भाजपने बाजी मारत सर्व पाचही उमेदवार निवडून आणले. शिंदे गटाचे आणि अजित पवार गटाचेही सर्व उमेदवार विजयी झाले. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी पहिल्या पसंतीच्या मतांनी निवडणूक जिंकली. ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर यांनी पहिल्यांदा मतांची आघाडी घेतली होती. मात्र बराच वेळ ते 17 आणि नंतर 22 मतांवर रेंगाळले होते. यात मात्र जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT