Devendra Fadnavis, Uddhav Thackeray  Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis Reply To Thackeray : '' ...म्हणून रात्री एक वाजता अमितभाईंना फोन केला ! '' ; ठाकरेंचा 'तो' दावा फडणवीसांनी खोडून काढला

BJP Vs Shivsena : '' काही खाती जास्त हवी ती देऊ. मंत्रिपदं जास्त देऊ, पण...''

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : गेल्या काही दिवसांपासून राज्यात पहाटेच्या शपथविधीवरुन राजकारण तापलं होतं. पहाटेच्या शपथविधीवरुन राजकीय आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी थंडावत नाही तोच माजी मुख्यमंत्री व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीची शपथ घेऊन 2019 ला भाजपासोबत अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युल्यावर बोट ठेवत वातावरण तापवलं. आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे यांचा दावा खोडून काढतानाच त्यावेळचा पडद्यामागच्या घडामोडींचा पटच जाहीर केला आहे.

भाजपचं गुरुवारी ( दि.१३) भिवंडीत एकदिवसीय शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस( Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात उद्धव ठाकरे यांच्या टीकेचा खरपूस समाचार घेतला आहे. फडणवीस म्हणाले, 2019 ला भाजप-शिवसेनेचं पूर्ण बहुमत आलं. पण काही लोकं खोट्या शपथा घेत आहे. मला याचं दु:ख आहे.त्यांनी पोहरादेवीला जाऊन खोटी शपथ घेतली. त्यांनी मनात देवीची माफी मागितली असेल की, राजकारणासाठी मला खोटं बोलावं लागलं असाही टोला ठाकरेंना लगावला.

फडणवीस नेमकं काय म्हणाले..?

देवेंद्र फडणवीस म्हणाले, २०१९ ला युतीची बोलणी सुरु होती. ती सुरु असताना एका रात्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं की, मी दोन दिवसांपूर्वी अमितभाईंशी बोललो होतो. त्यांना विनंती केली आहे की, आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे. त्यावेळी मी त्यांना मला हे सांगण्यात आलेलं नसल्याचं सांगितलं. तेव्हा रात्री एक वाजला होता.

लगेच मी अमित शाहां(Amit Shah) ना मी फोन केला. त्यांना उद्धवजी म्हणत आहेत तुमच्याशी त्यांचं बोलणं झालं आहे आणि त्यांना मुख्यमंत्रीपद हवं आहे. मी कॉन्फिडंट नाही, तुम्ही सांगा काय करायचं. त्यावेळी अमित शाह म्हणाले, मी त्यांना स्पष्ट सांगितलं आहे की, मुख्यमंत्रीपदाच्या संदर्भात वर्षानुवर्षे आपला फॉर्म्युला ठरला आहे. त्यामुळे या संदर्भात कुठलीच तडजोड होणार नाही.

काही खाती जास्त हवी ती देऊ. मंत्रिपदं जास्त देऊ, पण मुख्यमंत्रीपद वाटलं जाणार नसल्याचा अमित शाहांचा निरोप ठाकरेंना दिल्याचं फडणवीस म्हणाले. मग उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले, हे जर होणार नसेल तर युती करणं कठीण आहे असंही फडणवीस यांनी सांगितले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT