Ahmednagar Politics: आमदार लंकेंना वैष्णोदेवी पावणार का?; मंत्रिपदाची खलबतं सुरू असतानाच दर्शनासाठी रवाना

MLA Nilesh Lanke: राज्यात मंत्रिपदाच्या वाटपाची चर्चा सुरू असतानाच आमदार लंके वैष्णोदेवीच्या दर्शनाला रवाना झाले आहेत.
MLA Nilesh Lanke
MLA Nilesh LankeSarkarnama
Published on
Updated on

राजेंद्र त्रिमुखे :

Ahmednagar News: राज्यात 2 जुलै रोजी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक मोठा गट सोबत घेत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामिल होत शरद पवार यांना सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर लगेचच अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या इतर आठ जेष्ठ नेत्यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, मंत्रिपदाची शपथ घेऊन आठवडा उलटला तरी मंत्रिपदी विराजमान झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांसह नऊ मंत्र्यांचे खाते वाटत झालेले नाही.

तर दुसरीकडे गेल्यावर्षी शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या अनेक इच्छुकांना वर्षभरापासून मंत्रिपदाची आस लागलेली आहे. यामध्ये आमदार भरत गोगावले, संजय शिरसाठ यांच्यासह शिंदे शिवसेनेच्या आदी आमदारांचा समावेश आहे. तर प्रहारचे बच्चू कडू देखील मंत्रिपदासाठी आग्रही असल्याचे अनेकदा त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले.

MLA Nilesh Lanke
Ahmednagar Politics: शरद पवारांनी डाव टाकला; अजितदादांच्या निलेश लंकेंना देणार दणका?

अजित पवारांसह नऊ जणांची मंत्रिपदी वर्णी लागली असली खाते वाटप अद्याप झालेले नाही. तसेच बहुप्रतीक्षेत असलेल्या शिंदे गटातील इच्छुक आमदारांचा मंत्रिमंडळ विस्तारात समावेश आणि भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्याही (अजित पवार गट) अजून काही आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. यामध्ये अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि पारनेरचे आमदार निलेश लंके यांची नावे चर्चेत आहेत.

खाते वाटपाच्या संदर्भाने सध्या शिंदे, फडणवीस, अजित पवार यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. तर यावर तोडगा काढण्यासाठी काही नेत्यांची दिल्लीवारीही झाली आहे. दुसरीकडे सत्तेत आलेल्या राज्यातील तीनही पक्षातील अनेक आमदारांनी मुंबईचा रस्ता धरलेला आहे.

माहितीनुसार आमदार संग्राम जगताप हे मुंबईत विश्वासू कार्यकर्त्यांसह पोहचले असल्याचं बोललं जात आहे. मात्र, याचवेळी आमदार निलेश लंके हे कुठे आहेत यावर मोठी चर्चा रंगली आहे. पण निलेश लंके हे ना आपल्या मतदारसंघात आहेत ना मुंबईत.

MLA Nilesh Lanke
Sugarcane Price Control Committee: राजू शेट्टींना मोठा धक्का; राज्य सरकारने ऊस दर नियंत्रण समितीतून वगळले...

मिळलेल्या माहितीनुसार, दर वर्षीच्या शिरस्त्या प्रमाणे आमदार निलेश लंके हे कार्यकर्त्यांसह वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी रवाना झाले आहेत, अशी महिती मिळाली आहे. आमदार लंके यांचे विश्वासू कार्यकर्ते माजी सरपंच राहुल झावरे यांनी या वृत्तास दुजोरा दिला आहे.

निलेश लंके हे माता वैष्णोदेवीचे भक्त असून गेल्या अनेक वर्षांपासून ते दरवर्षी न चुकता वैष्णोदेवी दर्शनाला जात असतात. त्यांच्या बरोबर त्यांचे कार्यकर्तेही सोबत असतात. रेल्वेने प्रवास करत जम्मूला जाणे आणि तिथून कटरा आणि पुढे वैष्णोदेवी दर्शन असा त्यांचा गेल्या अनेक वर्षांचा शिरस्ता आहे.

MLA Nilesh Lanke
Amarnath Yatra Update: अमरनाथ यात्रेत अडकलेल्या भाविकांसाठी 'या' मंत्र्यांचा थेट राज्यपालांना फोन; अन्...

त्यामुळे राज्यात जरी सध्या मंत्र्यांचे खाते वाटप किंवा मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाच्या संधीसाठी आमदारांमध्ये सुरू असलेली मोठी रस्सीखेच भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीत (अजित पवार गट) दिसून येत आहे. पण आमदार निलेश लंके हे सध्या आपल्या कार्यकर्त्यांसह वैष्णोदेवीच्या दरबारात नतमस्तक होण्यासाठी गेलेले आहेत.

निलेश लंके हे यापूर्वी शिवसेनेत होते. तेव्हापासून ते आणि त्यांचे कार्यकर्ते तसेच आपल्या मतदारसंघातील नागरिक विशेष करून महिला वर्ग यांना देवदर्शन करण्याचा उपक्रम राबवत आहेत. नगर जिल्ह्यातील मोहटादेवी येथे दरवर्षी ते नवरात्रमध्ये हजारोच्या संख्येने महिलांसाठी लक्झरी बस मधून देवी दर्शनाचा लाभ देतात.

त्याचबरोबर स्वतः कार्यकर्त्यांसोबत विविध देवस्थानांना भेट देतानाच दरवर्षी न चुकता वैष्णव देवी दर्शन हा त्यांचा शिरस्ता दिसून येत आहे. यावर्षी एकीकडे राज्यात सत्ता संघर्ष आणि सत्ता, मंत्रिपदे यावर मोठी रस्सीखेच असतानाही आमदार लंके ठरल्याप्रमाणे वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेले आहेत.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com