मुंबई

तर, फडणवीसांना येरवड्यात दाखल करावं लागेल - संजय राऊत

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Pramukh Balasaheb Thackeray) यांच्या स्मृतीदिनानिमित्त शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena MP Sanjay Raut) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील घडामोंडीवर भाष्य केले आहे. याच वेळी त्यांनी भाजपवर (BJP) अप्रत्यक्ष आरोपही केले आहेत.

''दसरा रॅलीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) बोलले होते की, देशाला खोटा हिंदुत्ववादाचा (Hinduttv) प्रसार करणाऱ्यापासून धोका आहे. निवडणुका आल्या की हे लोक धार्मिक वाद उकरुन काढतात. हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करतात. तर कधी भारत-पाकिस्तान वाद उकरुन काढतात. निवडणूक जिंकण्यासाठी दंगल भडकावी, हिंसाचार व्हावा, असचं यांना वाटत असतं, असे आरोप संजय राऊत यांनी भाजपवर केले आहेत. तसेच दसऱ्या रॅलीमध्ये आम्ही त्यांना खुल आव्हान केलं होतं. हे लोक कोण आहेत ते आम्हाला माहिती आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

''देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या भाजप कार्यकारिणीच्या बैठकीदरम्यान, कोण होतास तू काय झालास तू…'' असं म्हणत संजय राऊतांना टोला लगावला. याला उत्तर देताना संजय राऊतांनीही त्यांची खिल्ली उडवली आहे. ''अलीकडे ते खूप जुनी गाणी ऐकतात, त्यांच्याकडे खूप वेळ आहे. आम्ही काय होतो हे आम्हाला माहिती आहे आणि तुम्ही काय होतात हे सर्व महाराष्ट्रला माहिती आहे, आणि जर ही अवस्था अशीच राहिली तर पुण्याच्या येरवड्याच्या वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासारखी स्थिती निर्माण होईल, मात्र असं होऊ नये ही प्रार्थना करतो, असा चिमटाही त्यांना काढला.

''उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून या राज्याचा प्रत्येक नागरिकाला वाटतं की, मी मुख्यमंत्री आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हे मान्य केलं आहे. राज्यात प्रत्येकाला वाटत असेल तर त्याच मी स्वागत करतो,'' असही त्यांनी म्हटलं आहे. पण केंद्रात मात्र कोणत्याच मंत्र्याला तो असल्याचे वाटतच नाही, असा खोचक टोला लगावला आहे.

यावेळी बोलताना त्यांनी अभिनेत्री कंगना राणावतच्या (Kangana Ranout) वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. कंगनाने स्वातंत्र्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर तिने पुन्हा महात्मा गांधीबद्दल बेताल वक्तव्य केलं, यावर बोलताना संजय राऊत म्हणाले की, वेडी लोकं बरळतात, ते का बरळतात कोणत्या नशेमध्ये असतात, त्यांना नशेचा पुरवठा कोण करतयं, याचा तपास एनसीबी ने करावा, असा टोलाही लगावला आहे.

''महात्मा गांधी देशाच्या स्वातंत्र्य लढ्याचे नायक होते. देश आणि विश्व गांधीजीकडून प्रेरित आहे हे मॅडम ला माहिती असायला हवं. बाळासाहेब ठाकरे हेदेखील योध्दा होते. मराठी आणि हिंदुसाठी ते लढवय्ये महानायक होते. त्यांच्या स्मृती अखंड आमच्या मनात असतात. बाळासाहेब ठाकरे जर आज असते तर अनेक गोष्टींना आज ब्रेक लागला असता, त्या कुठल्या गोष्टी मी आता सांगत नाही. असंही संजय राऊतांनी सांगितल. पण हिंदू या यापुढे मार खाणार नाही आणि हिंदू पळकुटा नाही हे बाळासाहेबांनी देशाला दाखवून दिलं. महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाने ताठ मानेने जगण्यासाठी त्यांनी अखंड संघर्ष केला आणि मराठी माणसाच्या मनगटात त्यांनी चेतना जागवली. ''

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT