Raj Thackeray
Raj Thackeray sarkarnama
मुंबई

Manse : तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही... राज ठाकरेंनी उपटले पदाधिकाऱ्यांचे कान

Umesh Bambare-Patil

मुंबई : सोशल मीडियावर पक्षातल्या पक्षात पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही, असा सज्जड दम मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे. तुमचं काम सांगायचे असेल तर सोशल मीडियाचा वापर करा, असा सल्लाही त्यांनी पदाधिकाऱ्यांना दिला आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे पदाधिकाऱ्यांच्या कार्यक्रमात मनसे प्रमुख राज ठाकरे बोलत होते. यावेळी त्यांनी पक्षातील वाद सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांचे राज ठाकरे यांनी कान उपटले.

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना चांगलच खडसावले आहे. श्री. ठाकरे म्हणाले, '' कोणत्याही पदाधिकाऱ्याने पक्षातल्या पक्षात व्हॉटसॲप, फेसबुकच्या माध्यमातून सोशल मीडियात कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्या तर त्याला एकक्षणही पक्षात ठेवणार नाही, हे लक्षात ठेवा.

तुमचे चोचले खूप पुरवले. झालं तेवढं खूप झालं. तुमचं काम सांगायचे असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. जर उणीदुणणी काढत असाल तर काढून तर बघा, कुणी जर काढलं असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे, असा दम राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना भरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT