राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार...? शर्मिला ठाकरेंच्या त्या विधानाने चर्चेला उधाण

शर्मिला ठाकरे यांच्या या विधानामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे.
Raj Thackeray-Sharmila Thackeray-Uddhav Thackeray
Raj Thackeray-Sharmila Thackeray-Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

पुणे : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली असून बहुतांश आमदार आणि खासदार यांनी साथ सोडल्याने उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकटे पडले आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का, असा प्रश्न राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे (Sharmila Thackeray) यांना विचारण्यात आला असता ‘साद घातली तर येऊ देत...मग बघू,’ असे उत्तर देत दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात, असे संकेतच त्यांनी दिले आहेत. (Sharmila Thackeray's suggestive statement about Raj and Uddhav Thackeray coming together)

शर्मिला ठाकरे आज पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी पत्रकारांनी उद्धव आणि राज यांच्या एकत्र येण्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी वरील उत्तर दिले. दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का? या प्रश्नावर शर्मिला ठाकरे यांनी ‘तुम्हाला वाटतं का,’ अशी विचारणा केली. आमच्या वाटण्यावर काही नाही. ते राजसाहेबच ठरवतील, असेही त्या म्हणाल्या. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सध्या एकटे पडले आहेत, त्यामुळे राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याची हीच योग्य वेळ आहे का? या प्रश्नावर सुरुवातीला माहिती नाही, असे म्हणणाऱ्या शर्मिला ठाकरे यांनी नंतर मात्र ‘उद्धव ठाकरे यांनी साद घातली तर येऊ देत...मग बघू,’ असे उत्तर दिले.

Raj Thackeray-Sharmila Thackeray-Uddhav Thackeray
‘शिंदे-फडणवीसांचं सरकार म्हणजे काळू-बाळूचा तमाशा; शहाजी पाटील हे त्यातील सोंगाड्या’

शर्मिला ठाकरे यांच्या या विधानामुळे हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. भारतीय जनता पक्षाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत मुख्यमंत्रीपद मिळविले आहे. शिंदे यांच्या बंडामुळे बहुतांश नेतेमंडळींनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून मुख्यमंत्र्यांच्या गोटात जाणे पसंत केले. दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांच्यावर काही दिवसांपूर्वीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे, त्यामुळे राज हे आपले मोठे बंधू उद्धव यांना साथ देणार का, असा प्रश्न यानिमित्ताने पुन्हा चर्चेत आला आहे.

Raj Thackeray-Sharmila Thackeray-Uddhav Thackeray
‘दामाजी’ची सत्ता गमावलेले समाधान आवताडे खासगी साखर कारखाना सुरू करणार

भाजपने युती तोडल्यानंतरही विधानसभा निवडणुकीच्या वेळी मनसे आणि शिवसेना युतीची चर्चा रंगली होती. मात्र, ती प्रत्यक्षात येऊ शकली नव्हती. त्याबाबत राज ठाकरे यांनी अनेकदा त्यावर आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून भाष्य केले आहे. या दोन्ही भावांच्या एकत्र येण्याबाबत राज्यालाच नव्हे तर अख्खा देशाला कुतूहल आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com