Subash Desai, Raosaheb Danve sarkarnama
मुंबई

..तर महाराष्ट्राचा विकास निश्चित; देसाईंचीही भाजपच्या दानवेंना साद..

काॅंग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या विधानावर (Cm Thackerays Statement) नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असतांना पुन्हा (Shivsena-Bjp Close Again) शिवसेनेकडून जु्न्या मित्राला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई ः `रावसाहेब दानवे आणि मी या आठवड्यात दोनदा भेटलो, आम्ही असेच भेट राहिलो तर महाराष्ट्राचा विकास निश्चित आहे`. अशा शब्दांत राज्याचे उद्योग मंत्री व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना साद घातली आहे.

औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना उद्देशून आजी-माजी आणि एकत्रित आले तर भावी सहकारी असा उल्लेख केला होता.

मुख्यमंत्र्यांच्या या विधानानंतर दोन्ही पक्षात प्रेमाचे भरते आल्याचे दिसत आहे. मुंबईतील एका कार्यक्रमात उद्योगमंत्री सुभाष देसाई व रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे एकत्र आले होते. यावेळी देसाई यांनी आम्ही आठवड्यात दोनदा भेटल्याचा उल्लेख केला. शिवाय आम्ही असेच भेटत राहिलो तर महाराष्ट्राचा विकास निश्चित असल्याचे म्हटले आहे.

महाविकास आघाडी सरकारमधे वाढत असलेल्या कुरबुरी आणि शिवसेना-भाजप या दोन पक्षांमध्ये वाढत असलेली जवळीक पाहता पुन्हा एकादा युतीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. उघडपणे दोन्ही पक्षातील नेत्यांनी या चर्चेत अर्थ नसल्याचे सांगितले असले तरी एकमेकांना साद घालण्याची संधी मात्र कुणीच सोडत नसल्याचेही दिसून आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी भाजपला भावी सहकारी संबोधल्यामुळे राज्यात गेल्या आठवड्याभरापासून युतीच्या चर्चा झडू लागल्या आहेत. काॅंग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांच्या विधानावर नाराजी व्यक्त केल्याची चर्चा असतांना पुन्हा शिवसेनेकडून जु्न्या मित्राला जवळ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. एकत्रित कार्यक्रमांना हजेरी लावत दोघांनी भावी सहकारी बनण्याच्या दिशेने वाटचाल तर सुरू केली नाही ना? असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

मुंबईत वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित 'वाणिज्य उत्सव' परिषदेला सुभाष देसाई, रावसाहेब दानवे एकत्र आले होते. उद्योगक्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या परिषदेत सुभाष देसाई यांनी रावसाहेब दानवे यांना खूष करणारे विधान केले. मुख्यमंत्र्यांनंतर आता शिवसेनेचे मंत्री देखील तुझ्या गळ्या माझ्या गळ्या गातांना दिसत आहेत.

भावी सहकारी असा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर शिवसेनेचे महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे थेट दानवेंच्या घरी जाऊन पाहुणचार घेऊन आले होते. त्यानंतर उद्योग मंत्र्यांनी दानवे यांना आपण वारंवार भेटलो तर महाराष्ट्राचा विकास निश्चित होईल, असा विश्वास व्यक्त करत एक पाऊल पुढे टाकल्याचे म्हणावे लागेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT