Devendra Fadanvis|
Devendra Fadanvis| 
मुंबई

तर देवेंद्र फडणवीस राजीनामा देणार?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्राला उद्देशून भाषण केलं. या वेळी त्यांनी देशातील राजकारणातील घराणेशाही आणि भ्रष्टाचारावर सडकून टीका केली. "देशात काही जण असे आहेत की ज्यांच्याकडे जगण्यासाठी पैसा नाही, तर काही व्यक्ती अशा आहेत की त्यांच्याकडे चोरीचा पैसा कुठे ठेवायचा, हा प्रश्न आहे, भष्ट्राचार देशाला वाळवीसारखा पोखरतोयं," अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज व्यक्त केली.

पंतप्रधानांच्या घराणेशाहीच्या या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी निशाणा साधला आहे. रुपाली पाटील यांनी ट्वीट करत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या घरातील सदस्यांचा उल्लेख करत फडणवीस राजीनामा देणार का, असा सवाल केला आहे.

''गंगाधरराव फडवणीस - मा.आमदार, शोभाताई फडवणीस - माजी मंत्री, देवेंद्र फडवणीस - उपमुख्यमंत्री, वाट पाहूया ? मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून व त्यांच्या पक्षातून सुरवात करण्याची.'' असे ट्विट रुपाली ठोंबरे पाटील यांनी केले आहे. तसेच, ''देशाच्या लोकप्रिय पंतप्रधानांच्या शब्दाचा मान राखत घराणेशाहीचा वारसा लाभलेले देवेंद्र फडवणीस राजीनामा देतील का? असे दूसरे ट्विट करत रुपाली पाटील यांनी भाजपला सवाल केला आहे.

तसेच, राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. ''लोकशाही पद्धतीने भारतामध्ये सर्वांना निवडून येण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जरी घराणेशाहीतला व्यक्ती असला तरी सुद्धा त्याची कुवत आणि क्षमता असेल, तो निवडून येत असेल तर त्यात आक्षेप घेण्यासारखं काही नाही, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT