Rahul kanal- Nitesh rane  sarkarnama
मुंबई

तर नितेश राणे राजीनामा देणार का? - राहुल कनाल

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray)यांचे निकटवर्तीय राहुल कनाल (Rahul Kanal) यांच्या मुंबईतील घरावर मंगळवारी प्राप्तिकर विभागानं धाड टाकली. महाविकास आघाडीतील नेत्यांच्या पाठीमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागल्याने सत्ताधारी आणि विरोधकांत आरोपप्रत्यारोपांना उधाण आले आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्यानंतर आता राहुल कनाल यांच्या घरावर आयकर विभागाने छापेमारी केल्यानंतर विरोधी पक्ष भाजपने राहुल कनाल यांच्यावरही आरोप केले आहेत.(Rahul Kanal replied to nitesh Rane's Allegation)

भाजप आमदार नितेश राणे यांनी, राहुल कनाल यांच्या ८ आणि १३ जून २०२० रोजीच्या मोबाईल टॉवरचे लोकेशन आणि सीडीआर तपासल्यास दिशा सालियन आणि सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होवू शकते, असे ट्विट केले आहे. यावर राहुल कनाल यांनी तपास यंत्रणांनी माझा सीडीआर तपासावा. पण केवळ ८ आणि १३ जुनचा नाही तर संपूर्ण वर्षांचा तपासावा, त्यात जर काही आढळले नाही तर तुम्ही राजीनामा देणार का? कायम लक्षात ठेवा, देव महान आहे आणि कायम सत्यासोबत असतो. लोकांना फोन करत रहा आणि आनंद घेत रहा, असा खोचक टोलाही राहुल कनाल यांनी नितेश राणे यांना लगावला आहे.

दिशा सालियन प्रकरणात नितेश राणे यांनी आता आणखी एक नवा दावा केला आहे. राहुल कनाल यांच्या घरावर आयकर खात्याच्या छाप्यामुळे चर्चेत आले आहेत. राहुल कनाल यांचा दिशा सालियन मृत्यूप्रकरणाशी संबंध असल्याचा संशय नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला आहे. दिशा सालियन मृत्यूप्रकरणात राहुल कनालचा (Rahul Kanal)काय संबंध आहे, दिशाचा मृत्यू झाला त्या ८ जूनच्या रात्री आणि १३ तारखेला राहुल कनाल कुठे होता? त्या राहुल कनालचं मोबाईल टॉवर लोकेशन तपासायला पाहिजे. यामधून काहीतरी लिंक नक्की सापडेल, त्यासाठी तपास झाला पाहिजे, असेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

इतकेच नव्हे तर, राहुल कनाल हा आदित्य ठाकरे यांच्या नाईटलाईफ गँगचा सदस्य होता. राहुलचे वडील डेंटिस्ट होते. मग राहुलकडे इतका पैसा कुठून आला? कोणाचा पैसा आहे हा ? राहुल कनाल मुंबईत 'भाईजान' हे हर्बल हुक्कापार्लर आणि कॅफे बांद्रा नावाचं रेस्टाँरंटचाही मालक चालवतो. या रेस्टाँरंटचे बांधकामही बेकायदेशीर आहे. कोव्हिड काळातही राहुल कनालला पालिकेची अनेक कंत्राटे मिळाली. राहुल कनालला थेट शिर्डी संस्थानाचं विश्वस्तपद देण्यात आलं. राज्यपालनियुक्त आमदारांच्या यादीतही त्याचा समावेश असल्याची चर्चा होती. मग राज्य सरकारने राहुल कनालवर एवढी कृपादृष्टी का केली, असे सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केले. त्यामुळे आता शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT