Anjali Damania Sarkarnama
मुंबई

Anjali Damania On Eknath Khadse : सर्वात जास्त कोणी छळलं असेल, तर खडसेंनी! अंजली दमानियांविरुद्ध अब्रूनुकसानीचे किती खटले? (पाहा VIDEO)

Social activist Anjali Damaniya defamation cases corruption Eknath Khadse : एकनाथ खडसेंविरुद्ध लढाई कशी होती, यातून कसे अब्रूनुकसानीचे खटले दाखल झाले, याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी दिली.

Pradeep Pendhare

Mumbai News : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या भ्रष्ट कारभारावरून राजीनाम्याची मागणी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया पुन्हा केंद्रस्थानी आल्या आहेत. भ्रष्टाचाराविरोधातील लढाईत त्यांच्याविरोधात सर्वाधित खटले भाजपचे माजी मंत्री एकनाथ खडसेंकडून दाखल झाल्याचे त्यांनी सांगितले.

'सकाळ माध्यम समूह'च्या साम मराठी टीव्हीवरील 'ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट' विशेष भागात अंजली दमानिया यांनी, भ्रष्टाचाराच्या लढाई लढताना सर्वात जास्त कोणी छळलं असेल, तर एकनाथ खडसे यांनी, असा दावा करत खळबळ उडवून दिली.

अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसेंविरुद्ध (Eknath Khadse) भ्रष्टाचाराची दिलेली लढाई राज्यात त्यावेळी खूप गाजली. एकनाथ खडसे यांनी अंजली दमानिया करत असलेले आरोप खोटे असून, अब्रूनुकसानीचे खटले दाखल केले होते. एक-दोन नव्हे, तर तब्बल 32 खटले खडसें आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडून दाखल करण्यात आले होते, असे अंजली दमानिया यांनी सांगितले. ही लढाई सोपी नव्हती, असे सांगताना त्यांनी त्यावेळी काय-काय झाले, या गोष्टींना उजाळा दिला.

अंजली दमानिया यांनी 38 अब्रूनुकसानीचे दावे आहेत, असे सांगितले. त्याच्यात 28 कोर्टाने रद्द केले. त्यात 32 खडसेंनी दाखल केले होते. त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगून संपूर्ण महाराष्ट्राभर हे खटले दाखल केले होते. सहा जिल्ह्यांमध्ये एकच मुद्दा घेऊन 32 खटले दाखल केले. त्यापैकी 28 खटले न्यायालयाने रद्द केले. आता उरलेत चार, बाकीच्या छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) केल्या आहेत. त्यातील एक खटला समणकरांनी देखील दाखल केला आहे. 'चोरी तो चोरी ऊपर से सीनाजोरी', असा हा प्रकार आहे, असे सांगितले.

या भ्रष्टाचाराच्या लढाईत अनेकदा धमक्या आल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. 'एकदा रात्री अडीचच्या सुमारास धमकीचा फोन आला होता. 'तुम अंजली बोल रही है ना, तू खडसे के खिलाफ लढना छोड दे, वरना जीना हराम कर देंगे', अशी धमकी आली होती. मी यावर काहीसे डचकले, ट्रू कॉलरवर 'दाऊद टू', असे नाव आले. त्यावेळी मुंबई क्राइम ब्रांचचे सीपी संजय सक्सेना होते. त्यांच्याकडे तक्रार केली. त्याचा तपास काय झाला, हे आजपर्यंत कळले नसल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले.

खडसेंकडून खूप छळलं झाला

रवी पुजारी गँगकडून देखील धमकी आल्याचे सांगताना, सर्वात जास्त कोणी छळलं असेल, तर खडसेंनी! त्यांनी माझा नंबर ट्रेनमध्ये लावले होते. भुसावळमध्ये लावलेल्या ट्रेनमध्ये, 'खट्टी-मीठी बाते करने के लिए, फोन करे, फ्रि... फ्रि... फ्रि..', असे नंबर लावला होता. यानंतर असंख्य फोन सुरू झाले. यातून खूप संताप झाला. त्याच लोकांकडून माहिती घेत, त्या ट्रेनमधून पोलिसांकडून नंबर काढून घेतले, असे लढे दिले आल्याचे अंजली दमानियांनी सांगितले.

भाजपच्या मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध लढले आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांविरुद्धच तुमची लढाई असते, यावर बोलताना अंजली दमानिया म्हणाल्या, "याला मी तरी काय करू, सगळ्यात जास्त घोटाळे राष्ट्रवादीचे मंत्री करायचे. सगळ्याची नावं प्रख्यात आहेत. जो भ्रष्टाचार करेल त्याच्याविरुद्ध मी लढणार, गडकरींविरुद्ध देखील लढले होते. खडसेंविरुद्ध लढले. हे भाजपचे होते". लोकांकडून अनेक थिअरी तयार केल्या जातात. आज मी देवेंद्र फडणवीसांविरुद्ध बोलल्यास, म्हणतील शरद पवारांनी सांगितलं. शरद पवारांविरुद्ध लढल्यास म्हणतील देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं, असेही दमानिया यांनी म्हटले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT