Kirit Somaiya|
Kirit Somaiya| 
मुंबई

सोमय्यांना उच्च न्यायालयाकडून अटकेपासून दिलासा पण...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) मुंबई उच्च न्यायालयाने (High court) अटकेपासून संरक्षण दिले आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचेही निर्देश दिले आहेत. मात्र 18 एप्रिलपासून सलग चार दिवस चौकशीला हजर राहण्याचे निर्देशही न्यायालयाने सोमय्या यांना दिले आहेत.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेव्ह विक्रांत प्रकरणी आरोप केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या यांना आज (१३ एप्रिल) अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटिस बजावली होती. त्यांचे वकील विवेकानंद गुप्ता यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात सोमय्यांची बाजू मांडली. त्यामुळे आजही सोमय्या चौकशीसाठी हजर राहिले नाहीत.

आयएनएस विक्रांत प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यापासून किरीट सोमय्या नॉट रिचेबल आहेत. याबाबत विचारल्यास किरीट सोमय्या योग्य वेळी समोर येतील असे वकील विवेकानंद गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले.

काय आहे प्रकरण ?

गेल्या आठवड्यात संजय राऊत यांनी किरीट सोमय्यांवर गंभीर आरोप केले होते. भारतीय नौदलाची विक्रांत (INS Vikrant) युद्धनौका वाचवण्यासाठी किरीट सोमय्यांनी लोकवर्गणीतून जमा केला होता. मात्र हा निधी राजभवनापर्यंत पोहोचला नसल्याचं माहिती अधिकारातून स्पष्ट झालं असल्याचा खुलासा संजय राऊत यांनी केला होता.

माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बबन भोसले यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी जमा केलेली वर्गणी ही किरीट सोमय्या आणि नील सोमय्यां यांच्या लोकांनी गोळा केली होती. इतकेच नव्हे तर सोशल मीडियावर भांडूप, मुलूंड, चर्चगेट, दादर अशा विविध रेल्वे स्थानकांबाहेरही विक्रांतसाठी वर्गणी गोळा करण्यात आली होती. अनेक दिवस ही वर्गणी गोळा करण्यात आली.

तर, ठिकठिकाणी असलेल्या स्टीलच्या एका पेटीत लोकं येताजाता पैसे टाकायचे. यातनं केवळ 11 हजारांच्या आसपास निधी गोळा झाल्याचा दावा किरीट सोमय्यांनी केला आहे. तर दूसरीकडे तक्रारदार बबन भोसले यांनी त्यात दोन हजार रूपये टाकले होते, याशिवाय अन्य काही लोकांनीही हजारांमध्ये देणगी जमा केली.

तक्रारदार भोसले हे माजी सैनिक आहे, त्यामुळे त्यांच्या हेतूवर प्रश्न उपसथित कर उठवणंच चुकीच ठरेल. देशावरील, सैन्यावरील प्रेमापोटील त्यांनी आणि राज्यातील जनतेने हा पैसा दिला. त्यामुळे या पैशांच नक्की काय झालं याचा तपास व्हायला हवा. विक्रांत साठी जमा केलेला निधी कुणाच्या खात्यात गेला? याची चौकशी होण गरजेचं आहे. यासाठी आरोपींच कस्टडी मिळणं आवश्यक असल्याची भूमिका मुंबई पोलिसांनी घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT