तुम्ही तुमचा म्हसोबा बदलाला असेल आम्ही नाही- उत्तरसभेनंतर राऊतांचा पलटवार

Raj Thackeray| Sanjay raut| Politics|ठाण्यातील राज ठाकरे यांच्या उत्तरसभेनंतर शिवसेना-मनसेत चांगलीच जुंपली आहे.
Sanjay Raut on Raj Thackeray, Raj Thackeray News, Sanjay Raut News
Sanjay Raut on Raj Thackeray, Raj Thackeray News, Sanjay Raut NewsSarkaranama

मुंबई : उत्तरसभेत बोलताना राज ठाकरेंनी माझ्या शिवराळ भाषेवर टिका केली. पण किरीट सोमय्या यांच्यासारख्या महाराष्ट्रद्वेष्ट्याच्या विरोधात मी वापरलेल्या शिवराळ भाषेचा मला गर्व आहे. मी सोमय्या यांच्याविरुद्ध अशी भाषा का वापरली, याचा राज ठाकरे यांनी नीट अभ्यास केला असता तर त्यांना माझी वेदना समजली असती. अशा शेलक्या शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. (Sanjay Raut on Raj Thackeray)

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी काल (12 एप्रिल) ठाण्यात उत्तरसभा घेतली. या सभेनंतर शिवसेना मनसेत चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.याच पार्श्वभुमीवर संजय राऊत यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत खुलासा केला. याचवेळी, पण ज्याला ज्या भाषेत कळते त्याला त्याच भाषेत उत्तर द्यावे, असे अत्रे आणि बाळासाहेब यांनी आम्हाला शिकवले होते, त्यामुळं आम्ही त्याच भाषेत बोलणार, असा थेट इशाराही त्यांनी यावेळी दिला.

संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची असू नये, यासाठी हाच किरीट सोमय्या न्यायालयात गेला होता. सोमय्या आणि त्यांच्या पंटर्सनी मिळून मुंबईला महाराष्ट्रपासून वेगळे करण्यासाठी प्रेंझेटेशन तयार केले आहे. त्यासाठी सोमय्या आणि मुंबईतील काही धनदांडगे दिल्लीत लॉबिंग करत आहेत. ही गोष्ट समजल्यामुळे संतापाच्या भरात माझ्या तोंडातून शिवी बाहेर पडली.

पण राज यांना सोमय्यांच्या मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याच्या भूमिकेचे समर्थन करायचे असेल तर त्यांनी ते खुशाल करावे. राज ठाकरेंनी आपली भूमिका बदलली असेल तर त्यांनी सोमय्यांना शिवतीर्थवर बोलवून शाल-श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार करावा. माझी त्याला कोणतीही हरकत नाही. पण मराठी माणूस ही गोष्ट सहन करणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले. तुम्ही तुमचे दैवत बदलले असेल, तुम्ही तुमचा म्हसोबा बदलाला असेल आम्ही नाही. असेही यावेळी संजय राऊतांनी स्पष्ट केले.

पण राज ठाकरे आता भाजपाचा भोंगा बनले आहेत. ईडीची कारवाईतून भाजपने त्यांना सूट दिली आहे. गेल्या दीड वर्षांपासून हा भोंगा बंद होता. पण तुम्ही आम्हाला हिंदुत्व समजावण्याची गरज नाही. हिंदुत्व शिवसेनेच्या रक्तात आहे. जेव्हा जेव्हा हिंदुत्वावर हल्ला झाला, तेव्हा भाजपाचे हे नवे भोंगे समोर आले नाहीत.त्यावेळी केवळ बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदुत्वासाठी लढली आहे. त्यामुळे जे महाविकासआघाडीशी, शिवसेनेशी लढू शकत नाहीत, असे लोक अशा लोकांना लढण्यासाठी पुढे करत आहेत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com