BJP leader Kirit Somayya sarkarnama
मुंबई

ठाकरे, संजय पांडे विरोधात सोमय्या आणखी आक्रमक; उच्च न्यायालयात घेतली धाव...

माझे म्हणणे नोंदवून घेतल्यावर पोलिस निरीक्षक Police Inspector राजेश शांताराम देवरे Rajesh Devare यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास Distortion of facts करणारा बनावट एफआयआर Fake FIR (क्र. ०५८६/२०२२) दाखल केला.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : आपल्यावर झालेल्या हल्ल्यांची निःपक्षपाती चौकशी होण्यासाठी या घटनांचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करून घेतली आहे.

या याचिकेत सोमय्या यांनी त्यांच्यावर अलीकडच्या काळात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून झालेल्या हल्ल्यांच्या घटनांचा व त्या अनुषंगाने पोलिसांच्या वर्तनाचा उल्लेख केला आहे. याचिकेत म्हटले आहे की, खार पोलिस ठाण्यात आपल्यावरील झालेल्या हल्ल्याबाबत आपण बांद्रा पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यासाठी गेलो होतो. माझे म्हणणे नोंदवून घेतल्यावर पोलिस निरीक्षक राजेश शांताराम देवरे यांनी वस्तुस्थितीचा विपर्यास करणारा बनावट एफआयआर (क्र. ०५८६/२०२२) दाखल केला.

या एफआयआर विरोधात मी संबंधित पोलिस अधिकाऱ्यांकडे तातडीने तक्रार दाखल केली. या बाबत आपण राज्यपालांकडेही तक्रार केली आहे. मुंबई पोलिसांकडून आपल्यावरील हल्ल्यांची चौकशी योग्य पद्धतीने होण्याची खात्री नसल्याने हा तपास सीबीआयकडे सोपवावा, असेही सोमय्या यांनी याचिकेत नमूद केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT