Sanjay Raut On Sharad Pawar :  Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut on Sharad Pawar Resign: कधी ना कधी निर्णय घ्यावा लागतो पण..; संजय राऊत स्पष्टचं बोलले

भाजपविरोधी आघाडीत शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे.

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut on Sharad Pawar Resign : दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनीही निर्णय घेतला होता. कधीना कधी निर्णय घ्यावा लागतो पण आज शरद पवार यांच्या नेतृत्त्वाची गरज आहे. असं सूचक वक्तव्य खासदार संजय राऊत केलं आहे. ते मुंबईत माध्यमांशी बोलत होतं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षपदाचा राजीनाम्या संदर्भात ते बोलत होते.

शरद पवार यांनी राजीनाम्यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केल्यानंतर राज्यभरातसह देशभरातून त्यांच्या निर्णयाला विरोध करण्यात येत आहे. पवार यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, म्हणून सर्वांची मनधरणी सुरू आहे. पवारांनी त्यांच्या निर्णयापासून परावृत्त व्हावे म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या केंद्राबाहेर बसले आहेत. (Sharad Pawar Resign latest news)

शरद पवार यांनी गुरुवारी या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पवारांनी त्यांच्या निर्णय मागे घ्यावा, यासाठी देशपातळीवरील नेत्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांना फोन करुन 'अध्यक्षपदी शरद पवारांनीच राहावे," अशी विनंती केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना फोन करून पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी विनंती केली आहे.

भाजपविरोधी आघाडीत शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची आहे. लोकसभा निवडणुकीला फार काळ शिल्लक नसल्याने शरद पवार यांनी पक्षकार्यात कार्यरत राहावे, अशी इच्छादेखील या दोघांनी व्यक्त केल्याचे समजते. जम्मू आणि काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला, माकपचे नेते सीताराम ,आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंग, सीपीआयचे चे नेता डी राजा यांनी पवारांना फोन केला आहे, अध्यक्षपदी पवारांनीत राहावे, अशी विनंती या नेत्यांनीही केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT