Chandrashekhar Bawankule on Sharad Parar's resignation : शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी विविध मार्गांनी त्यांना गळ घालण्यात येत आहे. पवारांनी २०२४ची लोकसभा निवडणूक होईपर्यंत तरी निवृत्त होऊ नये, असे देशभरातील नेत्यांचे मत आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारले असता, तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे, असे ते म्हणाले. (We are not ascetics, we are a political party)
शरद पवार कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेतील. शेवटी त्यांना जो घ्यायचा, तोच निर्णय ते घेतील. राष्ट्रवादीचा कुठलाही नेता आमच्या संपर्कात नाही. कोणीही संपर्क केला नाही. कोणी आला तर आमचा झेंडा आणि दुपट्टा तयार आहे. आम्ही कोणाला ये म्हणणार नाही. मात्र आम्ही संन्यासी नाही, राजकीय पक्ष आहोत, असे आमदार बावनकुळे यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांना स्वत:चा पक्ष सांभाळता येत नाही. ४० आमदार त्यांना सोडून गेले आहेत. आताही रोज त्यांना लोक सोडून जात आहेत, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला. महाविकास आघाडीच्या वज्रमुठीला तडे गेले आहेत. त्यांच्या सभांना लोक येत नाहीत, आता त्यांना मंगल कार्यालयात वज्रमूठ सभा घ्यावी लागेल, असेही ते म्हणाले.
नागपूर काल (ता. ४ मे) माध्यमांशी आमदार बावनकुळे बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी केलेल्या पंतप्रधान मोदी यांच्यावरील आरोपांविषयी बावनकुळे म्हणाले, ज्यावेळी उद्धव ठाकरे आमच्या सोबत होते, तेव्हा मोदींवर स्तुतिसुमने उधळत होते, त्याचा आमच्याकडे रेकॉर्ड आहे. आता तुम्ही विरोधी लोकांसोबत गेल्याने आता तुम्हाला विरोध करणे भाग आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी कर्नाटक निवडणुकीत ‘जय बजरंगबली’चा नारा दिल्याचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा आम्हाला समज आली तेव्हापासून आम्ही हनुमान मंदिरात जातो. काँग्रेसने (Congress) बजरंग दलाबाबत घेतलेल्या निर्णयाला जनता मतदानामधून उत्तर देईल. कर्नाटकमध्ये भाजपला (BJP) विजय मिळणारच आहे. तर २०२४ च्या निवडणुकीत कॉंग्रेसला ईव्हीएममधून ४४० व्होल्टचा झटका लागणार असल्याचे बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी सांगितले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.