Maharashtra Bhushan Award: Sarkarnama
मुंबई

Maharashtra Bhushan Award: राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Appasaheb Dharmadhikari News : ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना 'महाराष्ट्र भूषण'पुरस्कार प्रदान...

सरकारनामा ब्यूरो

Mumbai : ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासह विविद नेतेमंडळींनी उपस्थितीत आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा सोहळा नवी मुंबई येथील खारघरमधील सेंट्रल पार्क मैदानावर दिमाखात पार पडला.

दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्याचं नानासाहेब धर्माधिकारी यांनी रुजवलेल्या रोपट्याचं वटवृक्ष करण्याचं कार्य करणाऱ्या आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा राज्य सरकारचा सर्वोच्च महाराष्ट्र भूषण पुरस्कार काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला होता. हा अभूतपूर्व सोहळा याची देही, याची डोळा पाहण्यासाठी लाखो अनुयायांनी हजेरी लावली होती.

दासबोध आणि श्री सद्गुरू चरित्रच्या माध्यमातून समाज घडवण्याचं कार्य आप्पासाहेब धर्माधिकारी प्रदीर्घ काळापासून करत आहेत. त्यांचे वडील नानासाहेब धर्माधिकारी यांच्याकडून त्यांनी हा वारसा घेतला. श्रवण बैठकांच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाज परिवर्तनाचं कार्य त्यांच्याकडून गेली आठ दशकं सुरू आहे. 2019 मध्ये एबीपी माझानंही 'माझा सन्मान' देऊन आप्पासाहेबांना सन्मानित केलं होतं. आज महाराष्ट्र सरकारच्या वतीनं ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी(Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याविषयी गौरवोद्गार काढले. शिंदे म्हणाले, माझं कुटुंब उध्वस्त झालं. त्यावेळी ठाण्यात धर्मवीर आनंद दिघे यांनी मला साथ दिली. तसेच पुन्हा एकदा सामाजिक कार्य करण्यासाठी झोकून देण्याची उभारी मला नानासाहेब व आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिली. त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर उभा आहे.

भरकटलेल्यांना मार्गावर आणण्याचं काम या प्रतिष्ठानतर्फे करण्यात येत आहे.आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारी गर्दी सर्व विक्रम मोडणारी आहे. तसेच राजकीय सत्तेपेक्षा आध्यात्मिक शक्ती मोठी असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहे.माणसं घडविण्याचं विद्यापीठ म्हणजे मुक्काम पोस्ट रेवदंडा आहे.

पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आध्यात्मिक श्रेत्रासह सामाजिक क्षेत्रात दिलेलं योगदान उल्लेखनीय आहे. त्यांच्या धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान, स्मशानभूमी आणि कब्रस्थानांची स्वच्छता, विहिरींमधील गाळ काढून स्वच्छ करणं, यासह अनेक कामं या माध्यमातून केली जातात.

ज्येष्ठ निरुपणकार दिवंगत नानासाहेब धर्माधिकारी यांनाही 2008 मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे मरणोत्तर 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानं गौरविण्यात आलं होतं. एकाच कुटंबात दोन व्यक्तींना महाराष्ट्र भूषण या राज्य सरकारच्या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT