BJP-NCP Politics: 'या सरकारचं काऊंटडाऊन सुरु झालंय'; राष्ट्रवादीच्या नेत्याचं सूचक वक्तव्य...

राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात (supreme court) अद्याप प्रलंबित आहे.
Shinde-Fadanvis Politics :
Shinde-Fadanvis Politics :Sarkarnama
Published on
Updated on

Maharashtra politics | राज्याच्या सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात (supreme court) अद्याप प्रलंबित आहे. राज्यात एकीककडे विरोधी पक्षातील नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत भाजप आणि शिंदे गटात सामील होत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अमोल मिटकरी यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. शिंदे फडणवीस सरकारचं काउंटडाऊन सुरू असल्याचं मिटकरी यांनी म्हटलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. (This government's countdown has started'; Indicative statement of NCP leader)

एका वृत्त वाहिनीशी बोलताना त्यांनी हे सूचक वक्तव्य केलं आहे. '' राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. आजची तारीख आणि वेळ लिहून घ्या, लवकरच हे सरकार तुम्हाला सत्तेवर दिसणार नाही, राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालेलं दिसेल. असं त्यांनी म्हटलं आहे.

Shinde-Fadanvis Politics :
Gulabrao Patil News : शिंदे गटाच्या मनात चाललंय काय? शिवतारेंनंतर गुलाबरावांचंही अजितदादांविषयी मोठं विधान

जाणीवपूर्वक दबाव टाकून राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा खासदार संजय राऊत यांनी दावा केला होता. यावर बोलताना मिटकरी म्हणाले की, दबाव टाकून राष्ट्रवादी काँग्रेसला फोडण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून सुरु आहे पण तो कधीही यशस्वी होणार नाही. उलट त्यांचंच काऊंटडाऊन सुरू झालं आहे. याशिवाय मिटकरी यांनी केलेल्या एका ट्विटचीही राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. ''भाजपा कडून आपला व आपल्या सहकाऱ्यांचा राजकीय घात झालाय हे फक्त एकनाथ शिंदे साहेबांना कळून चुकलंय.. (शिंदे गटातील माझ्या एका आमदार मित्राची विश्वासपुर्ण माहिती) असं ट्विटही त्यांनी केलं आहे.

दरम्यान, २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने मिळून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. परंतु जून २०२२ मध्ये राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. शिवसेनेचे गटनेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाशी बंडखोरी करत शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन गट स्थापन केला आणि काही दिवसांतच त्यांनी भाजपच्या पाठिंब्यावर राज्यात सत्ता स्थापन केली.

Edited By-Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com