मुंबई

एसटी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारला बेमुदत संपाचा इशारा

बुधवार ( २७ ॲाक्टोबर) पासून प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत राज्यभर उपोषण आंदोलन सुरु करण्याचा इशाराच संघटनेने दिला आहे.

सरकारनामा ब्युरो

मुबंई : ऐन दिवाळीला (Diwali) काही दिवस शिल्लक राहिले असताना आता महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतन श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेने (ST karmchari Sanghatna) बेमुदत संपाचा इशारा दिला आहे. बुधवार ( २७ ॲाक्टोबर) पासून प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी बेमुदत राज्यभर उपोषण आंदोलन सुरु करण्याचा इशाराच संघटनेने दिला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहीत संघटनेने काही मागण्या केल्या आहेत. त्यामुळे आता ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी संप केला तर राज्यातील ग्रामीण भागासह दसरा दिवाळीला शहरातून गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता राज्यशासन यावर काय भुमिका घेते, याकडे संपुर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

'' महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ राज्य शासनात विलीन करून एसटीच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना न्याय द्या. प्रवाशांच्या सेवेसाठी असे ब्रीदवाक्य असलेले एसटी महामंडळ महाराष्ट्रातील मराठी जनतेच्या अत्यावश्यक सेवेतील एक महत्त्वाचा घटक आहे. आज खेड्यापासून महानगरांपर्यंत एसटी ही अत्यावश्यक सेवेतील घटक आहे. मात्र एसटी महामंडळ तोट्यात असल्यानं महामंडळा प्रवाशांची उत्तम प्रकारे सेवा देण्यास अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत एसटी महामंडळ राज्य शासनात विलिन केल्यास महाराष्ट्र शासन अधिक सक्षम होऊ शकते.

देशातील हिमाचल, गुजरात, आंध्रप्रदेश, उत्तरप्रदेश,राज्यातील परिवहन महामंडळास राज्यशासनाच्या वतीने चालवले जाते. या राज्यातील महामंडळातील कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन, भत्ते, सोईसुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी निवडणुकीच्या जाहीरनाम्यात एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन देण्याचे आश्वासन दिले होते. आता प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, अशी मागणीही या पत्राद्वारे एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.

मागील दिवाळीच्या वेळीही एसटी कामगार संघटनेनं राज्यभर आक्रोश आंदोलन केलं होतं. त्यावेळी एसटीच्या एक लाख 10 हजार कर्मचाऱ्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी राज्यशासनाने परिवहन मंडळाला एक हजार कोटींचं पॅकेज मंजूर केलं. त्यानंतर परिवहन महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत पगार दिले. मात्र गेल्या काही महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे आतातरी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT