उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तिसरी घंटा वाजवून नाट्यगृह पुन्हा सुरू करण्यात आली. याप्रसंगी अजित पवारांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात रंगमंच पूजन करण्यात आलं. तसेच, दिवाळीनंतर १०० टक्के क्षमतेनं नाट्यगृह सुरू करण्याचा विचार करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी बोलताना 'सरकार चालवताना हे बंद करा, ते बंद करायला सांगणे आम्हालाही आवडत नाही. पण निसर्गापुढे सर्वांचाच नाईलाज असतो. आता कोरोना संकटानंतर तब्बल 19 महिन्यानंतर शुक्रवारपासून (ता. 22) राज्यातील नाट्यगृह सुरू होत आहेत. यावेळी बोलताना पवार यांनी मुंबईतील बॉलिवून बाहेर जाऊ देणार नाही असं सांगत पवारांनी बॉलिवूड मुंबईतच राहणार असल्याचं सांगितलं.
कोल्हापूर आणि मुंबई येथील चित्रनगरीत उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे. चित्रपट आणि नाट्यगृहांसाठी आवश्यक असलेल्या विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्याचा विचार करण्यात येत आहे.
पण सर्वकाही सुरु केल्यानंतर गहाळ राहून चालणार नाही. त्यामुळे निर्बंधात शिथिलता दिली असली तरी खबरदारीही घ्यायची आहे. प्रत्येकाला सन्मानाने जगता यावे, यासाठी सरकार नेहमीच प्रयत्नशील असते. त्यामुळेच नाट्यगृहांना परवानगी दिली आहे. कोरोना संसर्ग कमी झाल्यास दिवाळीनंतर 100 टक्के उपस्थितीचाही निर्णय घेऊ.
कोरोनामुळे कलाकारांचे झालेले नुकसान पाहता त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. एकल कलावंतांना 5 हजार आणि प्रयोगात्मक कलेच्या क्षेत्रातील संस्थांना ५० ते ७० हजार रुपये याप्रमाणे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे.
कोरोना काळात निर्माते, दिग्दर्शक, कलाकार सर्वांनीच खूप सहन केले आहे. त्यामुळे कलाकारांच्या मागणीनंतर बालगंधर्वच्या नाट्यगृहाचा नुतनीकरणाबाबत महापौर व आयुक्तांशी चर्चा करू. रंगमंदिर या काळात पाडले तर येथील नाटकं बंद होतील, असंही पवार म्हणाले.
राज्याच्या विकासाचा विचार करताना कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीचा विचारही तेवढाच महत्वाचा आहे. महाराष्ट्राची वैभवशाली सांस्कृतिक परंपरा पुढे नेण्यासाठी एक कुटुंब म्हणून सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन त्यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.