Kunal Kamra-Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Kunal Kamra: एकनाथ शिंदेंची टिंगल उडवणाऱ्या कुणाल कामराला पोलिसांनी बजावलं समन्स

Stand-up comedian Kunal Kamra summoned by Khar Police: कुणाल कामरा हा आपल्या विधानावर ठाम आहे. आपण माफी मागणार नाही, कोर्टानं सांगितलं तरच माफी मागणार, अशी ठाम भूमिका कुणालने घेतली आहे.

Mangesh Mahale

Mumbai, 25 March 2025:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गाण्याच्या माध्यमातून टिंगल उडवणाऱ्या स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याच्या विरोधात खार पोलिसांनी समन्स बजावलं आहे.

कुणाल कामरा यांच्या कुटुंबियांकडे खार पोलिसांनी समन्स दिले आहे. कुणाल याला व्हॅाटस्अँपवरुन पोलिसांनी हे समन्स पाठवले आहे. आज सकाळी अकरा वाजता चौकशीसाठी हजर राहावे, असे पोलिसांनी समन्समध्ये म्हटलं आहे.

कुणाल कामरा हा आपल्या विधानावर ठाम आहे. आपण माफी मागणार नाही, कोर्टानं सांगितलं तरच माफी मागणार, अशी ठाम भूमिका कुणालने घेतली आहे. याबाबत त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करणारं गाणं कुणाल कामराने गायलं आहे. त्यानंतर शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. संतप्त कार्यकर्त्यांनी कुणाल कामरा यांच्या स्टुडिओची तोडफोड केली आहे.

पोलिसांनं सहकार्य करणार असल्याचे त्याने एक्सवर म्हटलं आहे. मी बेडखाली लपून बसणाऱ्यांपैकीही नाही, असं सांगतानाच अजित पवार जे बोलले तेच मी बोललोय, असे कुणाल कामराने म्हटलं आहे.

कुणार कामराने काय म्हटलं आहे एक्सवर

  • हॅबिटॅट हा एक मनोरंजनाचा मंच आहे. सर्व प्रकारच्या जागांसाठीचं ते एक व्यासपीठ आहे.

  • हॅबिटॅट (किंवा इतर कोणतेही स्थळ) माझ्या विनोदासाठी जबाबदार नाही.

  • माझं बोलणं आणि कृती यावरही कोणतं नियंत्रण नाही. कोणताही राजकीय पक्षही नाही.

  • एका विनोदी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणे तितकेच मूर्खपणाचे आहे.

  • तुम्हाला दिलेले बटर चिकन आवडले नाही म्हणून टोमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवण्याचाच हा एक प्रकार आहे, असा चिमटा कुणालने काढला आहे.

मी धमक्यांना घाबरत नाही

कॉमेडियन कुणाल कामराने माफी मागण्यास नकार दिला आहे. राजकारण्यांची खिल्ली उडवणं कायद्याविरोधात नसल्याचे त्याने सोशल मीडियावर म्हटलं आहे. तपास यंत्रणा, कोर्टाला सहकार्य करणार असल्याचे त्याने सांगितले आहे. मी धमक्यांना घाबरत नाही असे त्याने स्पष्ट केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT