मुंबई : राज्याचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार (ajit pawar) यांनी आज अधिवेशनात सादर केला. राज्यात विकासाची पंचसूत्री राबविणार येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीचा हा तिसरा अर्थसंकल्प आहे. कृषीक्षेत्र, कृषीसिंचन, पशुवैद्यकीय, पीक कर्ज अशा कृषीक्षेत्रांशी निगडीत बाबींसाठी अधिक तरतूद करण्यात आली.
अजित पवार म्हणाले, ''यंदाच्या अर्थसंकल्पात पीक कर्जात वाढ करण्यात आली आहे. हिंगोलीत बाळासाहेब ठाकरे कृषी संशोधन केंद्र उभारण्यात येणार आहे. संभाजी महाराज यांचे स्मारक हवेली तालुक्यात उभारण्यात येणार आहे. यासाठी २५ कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली. कृषीक्षेत्र हाच विकासाचा पाया आहे. त्यामुळे कृषी संशोधनासाठी अधिक निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे,''
''पीक कर्ज वाटपात वाढ करण्यात येणार आहे. महिला शेतकऱ्यांना नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे अनुदान देण्यात येणार आहे. येत्या २ वर्षात १०४ सिंचन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. कोकण, परभणी कृषी विद्यापीठाला ५० कोटींचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जलसंपदा विभागाला १३ हजार कोटी २५२ रुपये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. १ लाख हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात येणार आहे. तर ६० हजार कृषी पंपाना वीज देणार येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
मुंबईतील पशुवैद्यकीय रुग्णालयाला १० कोटी रुपयांचा निधी उपलद्ध करुन देण्यात येणार आहे. प्रत्येक महसूल विभागात एक शेळी प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. नांदेड, अमरावती, भंडारा, जालना, अहमदनगर आणि सातारा याठिकाणी प्रत्येकी ५० खाटांचे प्रथम दर्जाचे शासकीय ट्रॉमा सेंटर उभे करण्यात येणार आहेत, असे पवार यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.